IND vs PAK : भारताने पाकिस्तानला झुकवलं, सुनील छेत्रीची ‘रेकॉर्डवाली’ हॅट्ट्रिक!

WhatsApp Group

SAFF Championship 2023 IND vs PAK : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने हॅट्ट्रिक करून इतिहास रचला आहे. सुनील छेत्रीने पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात (India vs Pakistan) हॅट्ट्रिक केली आहे. दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (SAFF Championship) या फुटबॉल स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना झाला. बंगळुरू येथील श्री कांतीराव येथे हा सामना झाला. भारताने हा सामना 4-0 ने जिंकून पाकिस्तानला मानहानीकारक पराभव दिला.

सुनील छेत्रीची हॅट्ट्रिक

सुनील छेत्रीने पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दमदार कामगिरी दाखवली. या सामन्यात त्याने 3 गोल करत शानदार हॅट्ट्रिक केली. यातील दोन गोल छेत्रीने पेनल्टी स्पॉटवरून केले. मात्र, या हॅट्ट्रिकसह भारतीय कर्णधाराने आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फुटबॉलपटू ठरला आहे.

हेही वाचा – भारतात पहिल्यांदा पकडले गेले ‘डिझायनर ड्रग्ज’, किंमत ऐकून कान फाटतील!

सुनील छेत्री पाकिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी पूरन बहादूर थापा, आयएम विजयन आणि जेजे लालपेखलुआ यांनी हा पराक्रम केला आहे.

10व्या मिनिटाला सुनीलने सामन्यातील पहिला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानला पुनरागमनाची संधी मिळाली होती. मात्र, सामन्याच्या 16व्या मिनिटाला सुनीलने दुसरा गोल करत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली. हा दुसरा गोल पेनल्टीतून झाला.

ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने इंटरकॉन्टिनेंटल कपचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लेबनॉनचा पराभव करून भारताने इंटरकॉन्टिनेंटल कप विजेतेपद पटकावले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment