Sachin Tendulkar ECI : आगामी लोकसभा निवडणूक-2024 च्या तयारीसाठी भारत निवडणूक आयोग पूर्ण तयारीत आहे. यावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी महान क्रिकेटर आणि भारतरत्न पुरस्कार विजेता सचिन तेंडुलकरची निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून निवड केली आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत सचिन तेंडुलकर निवडणूक आयोगाच्या (ECI) खेळपट्टीवर फलंदाजी करणार आहे. सचिन तेंडुलकर ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून ECI सोबत नवीन इनिंगची सुरुवात करेल. यासंदर्भात बुधवारी आकाशवाणीच्या रंगभवन येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ECI ने गेल्या वर्षी प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली होती. यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रसिद्ध क्रिकेटपटू माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, चित्रपट अभिनेता आमिर खान आणि बॉक्सर मेरी कोम सारख्या दिग्गजांना देखील ECI ने राष्ट्रीय आयकॉन म्हणून निवडले आहे.
हेही वाचा – Asia Cup 2023 : भारतीय संघाची घोषणा झाल्यावर सुनील गावसकर भडकले? व्हिडिओ व्हायरल
दिग्गज क्रिकेटर सचिन रमेश तेंडुलकर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती आणि शिक्षणासाठी लोकांना प्रोत्साहित करणार आहेत. सचिन तेंडुलकर ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. 23 ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्या उपस्थितीत रंग भवन, ऑल इंडिया रेडिओ, नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत 3 वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करार केला जाणार आहे. विशेषत: तरुण मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे केले जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये, विशेषत: लोकसभा निवडणूक-2024 साठी मतदारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
या भागीदारीद्वारे, सामान्य जनता, विशेषतः तरुण आणि शहरी लोकसंख्येमधील निवडणूक प्रक्रियेत निर्माण झालेली दरी भरून काढण्याचे ईसीआयचे उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे शहरी आणि तरुणांच्या उदासीनतेची आव्हाने सोडवण्याचाही निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. ECI विविध क्षेत्रातील मान्यवर भारतीय व्यक्तींशी स्वतःला जोडून लोकशाहीच्या उत्सवात तरुणांना सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!