Sachin Tendulkar News In Marathi : गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडच्या दणदणीत विजयासह विश्वचषक 2023 ची सुरुवात झाली आहे. भारताव्यतिरिक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांना स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यासाठी दावेदार मानले आहे. सचिनने उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी निवडलेल्या संघांमध्ये पाकिस्तानचा समावेश नाही.
वर्ल्डकप 2023च्या सलामीच्या सामन्यापूर्वी सचिनने ट्रॉफी मैदानात नेली. त्यानंतर आयसीसीशी बोलताना सचिन म्हणाला, ”मैदानात वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन जाणे हा एक चांगला अनुभव होता. याच मैदानावर 2011 विश्वचषकाचा उपांत्यपूर्व सामना आम्ही जिंकला होता. 12 वर्षांनंतर या मैदानावर येणे हा एक उत्तम अनुभव आहे.”
हेही वाचा – World Cup 2023 : टीम इंडियाला अजून एक धक्का, हार्दिक पांड्याला दुखापत!
2011 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ चॅम्पियन झाल्याच्या आठवणींना उजाळा देताना सचिन म्हणाला, ”आम्ही विश्वचषक जिंकलो ती रात्र खास होती. आमच्यासह संपूर्ण देश आनंद साजरा करत होता. 2011 पर्यंत, कोणत्याही यजमान देशाने ही स्पर्धा जिंकली नव्हती, परंतु आता जवळजवळ प्रत्येक यजमान देशाने असे केले आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ चॅम्पियन होऊ शकतो.”
2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या चॅम्पियन होण्याच्या शक्यतांबाबत तो म्हणाला, ”मला अशी आशा आहे कारण आमचा संघ चांगला क्रिकेट खेळत आहे. जर गोष्टी सोप्या ठेवल्या आणि मूलभूत गोष्टींना चिकटून राहिल्यास संघ जिंकू शकतो. आमच्याकडे मजबूत फलंदाजी आहे, अतिशय उत्तम अष्टपैलू गोलंदाजी आक्रमण आहे.” विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या चार संघांबाबत सचिन म्हणाला, ”यात काही शंका नाही..भारत हा त्यापैकी एक आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडही यात असेल. भारतीय संघ अतिशय संतुलित आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा समतोलही चांगला असून त्यात अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंडचा संघही बलाढय़ आहे आणि त्यात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. न्यूझीलंड संघाबाबत बोलायचे झाले तर विश्वचषकातील संघाची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. हा संघ 2015 आणि 2019 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता पण पराभवामुळे विजेतेपदापासून वंचित राहिला होता.”
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!