Video : सचिन तेंडुलकरला टीम इंडियाचा पुळका? टीका करणाऱ्यांना म्हणाला, ”तुम्ही फक्त…”

WhatsApp Group

Sachin Tendulkar On Team India : भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर टीम इंडियावर सर्वत्र टीका होत आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडविरुद्धच्या दारूण पराभवानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने पहिले विधान केले आहे. त्याने टीम इंडियासाठी मोठी गोष्ट सांगितली आहे.

भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर म्हणाला, ”इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीतील पराभव खूपच निराशाजनक आहे. अॅडलेड ओव्हलमध्ये १६८ धावांचे लक्ष्य पुरेसे नव्हते, कारण मैदानाचा आकार असा आहे. बाऊंड्री लहान आहेत. १९० आणि त्‍याच्‍या जवळ असलेल्‍या धावसंख्‍या चांगली असती. आम्ही बोर्डवर मोठी टोटल केली नाही. आम्ही विकेट घेऊ शकलो नाही. इंग्लंड हा तगडा संघ आहे. १० विकेट्सनी पराभूत होणे हा दणदणीत पराभव आहे.

हेही वाचा – सांताक्रुझ पूर्व येथील खुल्या मैदानातील अतिक्रमण काढा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला, ”तुम्ही फक्त एका सामन्याच्या आधारे भारतीय संघाच्या कामगिरीचा न्याय करू शकत नाही. आम्ही टी-२० क्रिकेटमधला नंबर वन संघ आहोत. हे एका रात्रीत घडत नाही. येथे पोहोचण्यासाठी दीर्घकाळ चांगले क्रिकेट खेळावे लागते. खेळाडूंनाही बाहेर जाऊन अपयशी व्हायचे नव्हते. खेळात चढ-उतार येतच राहतात. यामध्ये आपण एकत्र असायला हवे.”

टीम इंडियाचा लाजिरवाणा निरोप

२०२२ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्याचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात होते. पाकिस्तानचा ४ विकेट्सने पराभव करत टीम इंडियाने चांगली सुरुवात केली, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ विकेट्सने पराभव झाल्यानंतर टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध, टीम इंडियाला हा सामना ५ धावांनी जिंकता आला आणि उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडविरुद्ध १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment