Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने गाठले पोलीस स्टेशन, केली तक्रार..! नक्की मॅटर काय?

WhatsApp Group

Sachin Tendulkar : इंटरनेटवर सुरू असलेल्या बनावट जाहिरातींमध्ये नाव, फोटो आणि आवाज वापरल्याने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत गुन्हा दाखल केला आहे. सचिनने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्याचे नाव, प्रतिमा आणि आवाज वापरून लोकांची फसवणूक होत असल्याचे म्हटले आहे. यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 420,465 आणि 500 ​​नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

भारतातील आणि जगभरातील सेलिब्रिटींना अशाच प्रकारच्या केसेसचा सामना करावा लागला आहे. इंटरनेटवर लोकांची फसवणूक करण्यासाठी, त्यांच्या फोटोंचा किंवा आवाजाचा वापर करून फसवणूक करून व्यवसाय वाढवला जातो. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिन तेंडुलकरच्या पर्सनल असिस्टंटला फेसबुकवर एका तेल कंपनीची जाहिरात सापडली. ज्याने आपल्या प्रचारासाठी सचिन तेंडुलकरांच्या फोटोचा वापर केला. ज्यामध्ये असे म्हटले होते की या महान क्रिकेटरने त्यांच्या उत्पादनाची शिफारस केली आहे आणि इन्स्टाग्रामवर तशाच जाहिराती देखील पाहायला मिळाल्या.

हेही वाचा – IPL 2023 : सूर्यकुमार यादवचा ‘तो’ शॉट पाहून खुद्द सचिनने केली नक्कल! पाहा Video

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये फसवणूक आणि बनावट कागदपत्रे आणि आयटी कायद्याशी संबंधित कलमांचा समावेश आहे. सचिन तेंडुलकरच्या फोटोचा किंवा आवाजाचा गैरवापर करून त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी किंवा ऑनलाइन लोकांची फसवणूक करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वी 2020 मध्येही तेंडुलकरच्या टीमने एक निवेदन जारी केले होते. ज्यामध्ये असे म्हटले होते की जे कंपन्या आणि व्यक्ती त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव, फोटो व्यावसायिकरित्या वापरत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. यानंतर तेंडुलकरने गोव्यातील एका कॅसिनोविरुद्ध जाहिरातींमध्ये त्याचे बनावट फोटो वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment