क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एका मोबाइल गेमिंग अॅपची जाहिरात करतानाचा व्हिडिओ (Sachin Tendulkar Deepfake Video) खोटा असल्याचे सांगितले. या व्हिडिओ जाहिरातीत युजर्सना सहज पैसे कमवण्याचे आमिष दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर मोबाईल गेमिंग अॅपच्या फीचर्सविषयी बोलत असल्याचे दाखवले आहे.
व्हिडिओमध्ये असे म्हटले जात आहे की त्याला (सचिन तेंडुलकर) हे माहीत नव्हते की पैसे कमवणे इतके सोपे झाले आहे आणि त्याची मुलगी या प्लॅटफॉर्मचा वापर करते. यानंतर सचिनने एका मेसेजसह व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने तंत्रज्ञानाच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा – मायावतींनी लग्न का केलं नाही? त्या शॉर्ट हेअरस्टाइल का ठेवतात?
सचिन म्हणाला, ”हा व्हिडिओ बनावट आहे आणि तुम्हाला फसवण्यासाठी बनवण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचा हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की असे व्हिडिओ किंवा अॅप्स किंवा जाहिराती दिसल्यास त्वरित कळवा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींवर लवकरात लवकर कारवाई करावी. चुकीची माहिती आणि बातम्यांना आळा बसावा आणि डीपफेकचा गैरवापर थांबवता यावा यासाठी त्यांची भूमिका या बाबतीत खूप महत्त्वाची आहे.”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!