Sachin Tendulkar Classic Maiden International Century : इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅटिंग करताना किती कमाल प्रेशर असेल विचार करा. त्यात वय लहान असेल तर? शिवाय भारतीय संघातील आपली जागा सेट होणार की नाही, याचं दडपण असेल तर? पण तो सचिन तेंडुलकर होता, त्याचं मोठं होणं, इतकं नाव कमावणं, भरभराट होणं, हे त्याच्या नशिबात लिहिलेलं होतं. त्यानं स्वातंत्र्यदिनापूर्वीच्या काही तासांपूर्वी कसोटी क्रिकेटमधील पहिलं शतक ठोकलं. त्याची इंनिग इतकी लाजवाब का होती, सचिन पुढे जाऊन काय तांडव करणार होता, याची उत्तरं त्याच्या पहिल्या इनिंगच्या व्हिडिओमध्ये आहेत.
#OnThisDay in 1990, Sachin Tendulkar scored his maiden international 💯 against England at Old Trafford pic.twitter.com/xn7j5N1Ww8
— General Knowledge (@Knowledge1176) August 14, 2024
पहिल्या कसोटी शतकाच्या इनिंगमध्ये सचिनने नवखा म्हणून सावध सुरुवात केली. चांगल्या चेंडूला सन्मान, पायापुढच्या चेंडूला हलकासा पुश, हाच चेंडू आखूड असेल तर पॉइंटच्या खेळाडूला जागं करण्याची बेल सचिननं संयमानं दाबली. पण हाफ सेंच्युरीनंतर आत्मविश्वास आलेल्या सचिननं हेच फटके जोरात ठोकले त्यातला स्ट्रेट बॅट फटका इतका कमाल आहे, की त्याची तुलना ‘विराट-हारिस रौफ शॉट’शी होऊ शकेल. सचिनची पन्नाशीनंतरची इनिंग इतकी लाजबाव होती, की सेंच्युरी पूर्ण झाल्यानंतर अंपायरनेही भुवया वर करून दाद दिल्याचे व्हिडिओच्या शेवटी समजते.
हेही वाचा – महाराष्ट्र : नगराध्यक्षांचा कालावधी आता 5 वर्षे, 6000 किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी काँक्रीटीकरण
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ज्याने 1990 मध्ये या दिवशी (14 ऑगस्ट) आपले पहिले शतक झळकावले होते. इंग्लंडविरुद्धच्या मँचेस्टर कसोटीच्या पाचव्या दिवशी तो 119 धावांवर नाबाद राहिला आणि भारताला पराभवापासून वाचवले. 408 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाच्या 6 विकेट्स 183 धावांवर पडल्या होत्या. सहाव्या क्रमांकावर आलेल्या सचिनने मनोज प्रभाकरसोबत 160 धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या 343/6 पर्यंत नेली आणि पराभवाकडे वाटचाल करणाऱ्या भारतीय संघाला सावरले.
#OnThisDay in 1990, the legendary Sachin Tendulkar scored his maiden international 💯 against England at Old Trafford 🙌
— BCCI (@BCCI) August 14, 2024
He hit that magnificent knock at the age of 17 👏👏@sachin_rt | #TeamIndia pic.twitter.com/hzEY4Ed92B
त्यावेळी सचिन पाकिस्तानच्या मुश्ताक मोहम्मद (17 वर्षे 78 दिवस) नंतर कसोटी शतक झळकावणारा दुसरा सर्वात तरुण क्रिकेटपटू होता.
व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!