ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिनर ब्रॅड हॉगने एका वनडे मॅचमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आऊट केलं. या मॅचनंतर हॉगने सचिनकडे ऑटोग्राफची मागणी केली. सचिननेही ऑटोग्राफ देताना असं काही लिहिलं, की क्रिकेटमधून रिटायर्ड होईपर्यंत हॉगला ते सलत राहिलं (Sachin Tendulkar Brad Hogg Story In Marathi).
5 ऑक्टोबर 2007 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 वनडे मालिकेतील शेवटचा सामना हैदराबाद येथे खेळला गेला. टीम इंडियासमोर विजयासाठी 291 धावांचे लक्ष्य होते. डावाची सुरुवात करण्यासाठी सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर मैदानात आले. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ब्रॅड हॉगने 20व्या षटकात सचिन तेंडुलकरला बोल्ड केले. या सामन्यात युवराज सिंगने शतक झळकावले होते. मात्र असे असतानाही या सामन्यात टीम इंडियाला 47 धावांनी पराभव पराजय लागला.
सचिन तेंडुलकरला बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रॅड हॉग त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आला. सचिन तेंडुलकरने हॉगला विकेट घेतलेल्या फोटोवर ऑटोग्राफ दिला. पण सचिनने त्या फोटोवर एक वाक्य लिहिलं.
हेही वाचा – 1 डिसेंबर 2023 पासून बदलणार मोठे नियम! सिम कार्ड, बँक आणि UPI बाबत माहिती
सचिन यात म्हणाला, हॉग यापुढे असे कधीही होणार नाही. हॉगने तो मेसेज फारसा गांभीर्याने घेतला नाही. मात्र सचिन याबाबत पूर्णपणे गंभीर होता. त्याने दिलेले वचन पूर्ण केले. त्या सामन्यानंतर ब्रॅड हॉग सचिन तेंडुलकरला कधीच आऊट करू शकला नाही. त्या घटनेनंतर सचिन आणि हॉग 17 वेळा आमनेसामने आले. पण हॉगची सचिनला परत आऊट करण्याची इच्छा अपूर्णच राहिली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!