Royal Challengers Bengaluru | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL 2024 च्या आधी आपले नाव बदलले आहे. विराट कोहली, स्मृती मंधाना आणि फाफ डू प्लेसिस यांनी आरसीबीचे नवीन नाव, लोगो आणि जर्सीचे अनावरण केले. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघ आरसीबीने आपल्या नावातून बंगलोर हा शब्द काढून टाकला आहे. त्याच्या जागी बंगळुरू हा शब्द जोडण्यात आला आहे. अशाप्रकारे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे नवीन नाव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) झाले आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये नाव बदलणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा तिसरा संघ आहे. याआधी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जच्या संघांनीही त्यांची नावे बदलली आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे जुने नाव दिल्ली डेअरडेव्हिल्स आहे. पंजाब किंग्जचे नाव आधी किंग्ज इलेव्हन पंजाब असे होते. मात्र, नाव बदलूनही या दोन्ही संघांना कधीही आयपीएलचे जेतेपद पटकावता आले नाही. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी नावातील बदल किती शुभ ठरतो हे पाहायचे आहे.
बंगळुरू संघ हा 8 संघांपैकी एक आहे, जो आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहे. आपल्या 16 वर्षांच्या दीर्घ आयपीएल प्रवासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ तीनदा फायनलमध्ये पोहोचला आहे, पण त्यांना विजेतेपद मिळवता आलेले नाही. विराट कोहलीने सर्वाधिक 143 सामन्यांमध्ये आरसीबीचे नेतृत्व केले आहे. त्याने संघाला दोनदा अंतिम फेरीत नेले, पण ट्रॉफी जिंकता आली नाही.
हेही वाचा – ”दाऊद इब्राहिमचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल…”, जावेद मियांदादचे वक्तव्य!
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सलग तिसऱ्या सत्रात फाफ डू प्लेसिस कर्णधार असेल. त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीने 27 सामने खेळले असून त्यापैकी 14 सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करणारा दक्षिण आफ्रिकेचा फाफ डु प्लेसिस हा पहिला कर्णधार ठरला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!