VIDEO : वर्ल्डकप गेल्यानंतर रोहित शर्माने पहिल्यांदा मोकळं केलं मन!

WhatsApp Group

वनडे वर्ल्डकपमधील पराभवावर रोहित शर्मा पहिल्यांदाच मुक्तपणे बोलला. त्या पराभवाच्या निराशेतून कधी सावरता येईल की नाही हे माहीत नव्हते, पण आता चाहत्यांच्या प्रेमाने त्याला पुन्हा एकदा टॉपवर पोहोचण्याचा प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली आहे, असे रोहित म्हणाला (Rohit Sharma On World Cup 2023 Loss In Marathi). पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवण्याचा रोहित विचार करत असल्याचे समजते.

रोहितचा एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून फायनलपर्यंतचा वर्ल्डकप प्रवास चांगला होता, पण 19 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाने भारताला फायनलमध्ये पराभूत केले. अंतिम पराभवानंतर रोहितने मैदान सोडले, तेव्हा त्याचे डोळे भरून आले होते. ही वेदना विसरण्यासाठी तो इंग्लंडला गेला होता.

रोहितने इंस्टाग्रामवर म्हटले, ”पहिले काही दिवस मला समजत नव्हते, की मी यातून कसा सावरेन. माझे कुटुंब आणि मित्रांनी मला प्रेरित केले. पराभव पचवणं सोपं नव्हतं, पण आयुष्य पुढे जातं आणि पुढे जाणं सोपं नव्हतं. लोक माझ्याकडे यायचे आणि सांगायचे की त्यांना संघाचा अभिमान आहे. मला खूप बरे वाटले. त्याच्यासोबत मीही वेदनातून सावरलो.”

हेही वाचा – औषधी गुणधर्माचा खपली गहू, ₹150 किलोने होते विक्री, ‘अशी’ करा लागवड!

”जेव्हा लोकांना समजते की खेळाडू कशातून जात आहेत आणि ते त्यांची निराशा किंवा राग व्यक्त करत नाहीत, तेव्हा ते आपल्यासाठी खूप अर्थपूर्ण असते. लोकांमध्ये राग नव्हता, त्यांनी फक्त प्रेम दिले, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे”, असे रोहितने सांगितले.

रोहित म्हणाला, ”संपूर्ण विश्वचषकादरम्यान आम्हाला प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा मिळाला. पण वर्ल्डकपचा मी जितका विचार करतो तितकेच मला वाटते, की आम्ही तो जिंकू शकलो नाही. मी 50 षटकांचा वर्ल्डकप पाहत मोठा झालो. हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. आम्ही यासाठी खूप मेहनत घेतली आणि आम्ही जिंकलो नाही तर निराश होतो. कधी कधी निराशा येते कारण आपण ज्यासाठी खूप मेहनत करत होतो, ज्याची स्वप्ने पाहत होतो, ते आपल्याला मिळाले नाही.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment