“रोहित शर्मा कॅप्टन बनायला तयारच होत नव्हता….”, सौरव गांगुलीचा मोठा खुलासा! म्हणाला, “आम्हा सर्वांना खूप…”

WhatsApp Group

Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ टी-20 मध्ये विश्वविजेता होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारतीय संघ 11 वर्षांपासून या ट्रॉफीची वाट पाहत आहे. रोहितच्या कर्णधारपदाबद्दल सौरव गांगुलीने खुलासा केला आहे की, एक काळ असा होता जेव्हा रोहित टीम इंडियाची जबाबदारी घेण्यास तयार नव्हता. खूप समजावून सांगितल्यानंतर रोहित भारतीय संघाचा कर्णधार झाला. भारतीय संघाला अंतिम फेरीत नेण्यात रोहितच्या कर्णधारपदाचा मोठा वाटा असल्याचं गांगुली म्हणाला.

ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघ विजयाचा दावेदार आहे. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जागतिक विजेतेपदाचा दुष्काळ या संघाला संपवायचा आहे. गांगुलीने कोलकाता येथे पीटीआयला सांगितले की, ”मी रोहित शर्मासाठी खूप आनंदी आहे. हे जीवनचक्र आहे की सहा महिन्यांपूर्वी तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार नव्हता, आता त्यांच्या नेतृत्वाखाली भारत विश्वचषक फायनल खेळणार आहे.”

सौरव गांगुली म्हणाला, ”रोहित दोन वर्ल्डकप फायनल खेळला आहे. संघाची मोहीम आतापर्यंत अपराजित राहिली आहे. यावरून त्यांचे नेतृत्वगुण दिसून येतात. त्याच्या यशाबद्दल मला आश्चर्य वाटत नाही कारण मी बीसीसीआय अध्यक्ष असताना तो कर्णधार झाला होता. त्यावेळी कर्णधारपदाची जबाबदारी द्यायला खूप वेळ लागला. कारण तो यासाठी तयार नव्हता. त्याला कर्णधार बनवण्यासाठी आम्हा सर्वांना खूप मेहनत घ्यावी लागली आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटची प्रगती पाहून मला खूप आनंद झाला.”

गांगुली म्हणाला, ”कधीकधी आयपीएलचे विजेतेपद जिंकणे खूप आव्हानात्मक असते कारण ही स्पर्धा दीर्घकाळ चालते. रोहितच्या नावावर पाच आयपीएल जेतेपदे जिंकण्याचा विक्रम आहे, ही मोठी उपलब्धी आहे. आयपीएल जिंकणे कधी कधी अवघड असते. मला चुकीचे समजू नका, मी असे म्हणत नाही की आयपीएल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा चांगले आहे. आयपीएल जिंकण्यासाठी तुम्हाला 16-17 (12-13) सामने जिंकावे लागतात.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment