T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. आणि यासोबतच भारताच्या विश्वचषक संघात कोणता खेळाडू स्थान मिळवेल हा प्रश्नही गहन होत चालला आहे. दरम्यान, संघ निवडीबाबत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात बैठक झाल्याचेही समोर आले आहे. या बैठकीतून आणखी एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे या विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली डावाची सुरुवात करू शकतात. म्हणजेच यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांच्यावरही गदा येऊ शकते.
हिंदी वृत्तपत्र दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, विराट कोहलीला भारताच्या टी-20 विश्वचषक संघातील स्थानाबद्दल स्पष्टता मिळाली आहे. या आयपीएलमध्ये कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आणि या फॉर्ममध्ये संघ व्यवस्थापन कोहलीला बाजूला करू इच्छित नाही.
जयस्वालबद्दल सांगायचे, तर त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये तो संघर्ष करताना दिसत आहे. शुबमन गिलसाठी दिलासादायक बातमी म्हणजे त्याचा बॅकअप सलामीवीर म्हणून समावेश केला जाऊ शकतो. आयपीएल 2024 मध्ये गिलने आतापर्यंत सहा सामन्यांत 255 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 151.78 आहे. तर जैस्वालला सात सामन्यांत केवळ 121 धावा करता आल्या.
हेही वाचा – चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाला चावला साप! अचानक पिन टोचल्यासारख झालं; मग तो उठला आणि…
आसामचा फलंदाज रियान परागने आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने सात सामन्यांमध्ये 161.42 च्या स्ट्राईक रेटने 318 धावा केल्या आहेत. शिवम दुबेचेही नाव चर्चेत आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या या अष्टपैलू खेळाडूने बॅटने अद्भुत कामगिरी केली आहे. त्याने 6 सामन्यात 163.51 च्या स्ट्राईक रेटने 242 धावा केल्या आहेत. दुबे चेन्नईसाठी अप्रतिम फिनिशर ठरला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा