वनडे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर कप्तान रोहित शर्माने आश्चर्यकारक निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आता भारतासाठी टी-20 फॉरमॅटमध्ये खेळणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. ”रोहितने वनडे वर्ल्डकप 2023 सुरू होण्यापूर्वीच त्याच्या भविष्याबद्दल छोट्या स्वरूपात चर्चा केली होती”, असे त्यांनी सांगितले.
भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मा आता टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची शक्यता नाही. नोव्हेंबर 2022 मध्ये भारत टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर, रोहितने या लहान फॉरमॅटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. तेव्हापासून हार्दिक पांड्याने भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले आहे. रोहितने आतापर्यंत 148 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने 140 च्या जवळपास स्ट्राइक रेटने 4 शतकांसह 3853 धावा जोडल्या आहेत.
हेही वाचा – डंकी रूट काय आहे, ज्याच्यावर शाहरुख खानचा नवीन चित्रपट येतोय?
आगरकरशी चर्चा
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले, ”हे काही नवीन नाही. रोहितने गेल्या एक वर्षापासून एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही कारण त्याचे लक्ष वनडे वर्ल्डकपवर होते. या संदर्भात त्याने चीफ सिलेक्टर अजित आगरकरशी सखोल चर्चाही केली होती. रोहितने स्वतः टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहण्याची इच्छा व्यक्त केली. हा पूर्णपणे रोहितचा निर्णय आहे.”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!