IPL 2025 मध्ये धोनीच्या CSK कडून खेळणार रोहित शर्मा?

WhatsApp Group

Rohit Sharma As CSK Captain | इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) आगामी हंगाम 22 मार्चपासून खेळवला जाणार आहे. आयपीएल 2024 मध्ये, सर्वांच्या नजरा रोहित शर्मावर असतील, जो यावेळी एक फलंदाज म्हणून मुंबई इंडियन्स (MI) साठी भाग घेईल. रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. मात्र या मोसमात मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले.

36 वर्षीय रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. हार्दिकने मागील दोन हंगामात गुजरात टायटन्सचे (GT) नेतृत्व केले होते. आयपीएल 2022 मध्ये हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले.

आता टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) माजी क्रिकेटर अंबाती रायुडूने रोहित शर्माबाबत मोठे वक्तव्य केले आहे. रायुडूला नजीकच्या भविष्यात भारतीय कर्णधार रोहितला चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना पाहायचे आहे. रायुडूचा असा विश्वास आहे की रोहित आरामात 5-6 वर्षे आयपीएल खेळू शकतो आणि धोनीच्या निवृत्तीनंतर तो CSK चे नेतृत्वही करू शकतो. आयपीएल 2025 च्या आधी एक मेगा लिलाव होणार आहे, त्यामुळे रायुडूच्या बोलण्यात काही वजन आहे असे दिसते.

न्यूज 24 शी बोलताना अंबाती रायुडू म्हणाला, ”मला नजीकच्या भविष्यात रोहितला CSK कडून खेळताना पाहायचे आहे. धोनीने निवृत्ती घेतल्यास तो संघाचे कर्णधारही होऊ शकतो. तो बराच काळ मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. तो CSK कडून खेळला आणि तिथेही जिंकू शकला तर खूप छान होईल. तो CSK चा कर्णधार होईल की नाही हे त्याच्यावर अवलंबून असेल. रोहित पुढील 5-6 वर्षे आरामात आयपीएल खेळू शकेल.

हेही वाचा – VIDEO : कपड्यांशिवाय ‘उघडा’ ऑस्कर 2024 च्या स्टेजवर पोहोचला जॉन सीना!

अंबाती रायुडू म्हणतो, ”जर रोहित शर्माला कर्णधार व्हायचे असेल तर संपूर्ण जग त्याच्यासाठी खुले आहे. त्याला हवे तिथे तो सहज नेतृत्व करू शकतो. तो कॉल घेण्याचा अधिकार रोहितकडे असायला हवा. त्याला नेतृत्व करायचे की नाही हा त्याचा निर्णय असेल.”

चेन्नई सुपर किंग्जचा सध्याचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2025 मध्ये खेळतो की नाही हे पाहणे मनोरंजक असेल. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर धोनी आयपीएल 2024 मध्ये CSK चे नेतृत्व करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. आयपीएल 2023 संपल्यानंतर धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. आयपीएल 2023 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनी म्हणाला होता, की तो चाहत्यांना रिटर्न गिफ्ट देऊ इच्छितो आणि आयपीएल 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी कठोर परिश्रम करणार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment