Rohit Sharma Overspeeding Challan News In Marathi : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर ओव्हरस्पीडिंगचा आरोप होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्याने ताशी 200 किमी पेक्षा जास्त वेगाने कार चालवल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. पण पुणे पोलिसांनी रोहितविरुद्ध असे कोणतेही चलन नसल्याचे सांगितले.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रोहितने ओव्हरस्पीड केल्याचे बुधवारी मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले. तो मुंबईहून पुण्याला त्याच्या वैयक्तिक लॅम्बोर्गिनी कारने सरावासाठी गेला होता. तिथे पोहोचून रोहितने ताशी 200 किमी वेगाने गाडी चालवली, अशा बातम्या समोर आल्या.
रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला (Rohit Sharma Overspeeding Challan) आहे, की ओव्हरस्पीडिंगमुळे वाहतूक पोलिसांनी रोहित शर्माच्या नावावर 3 ऑनलाइन चलन कापले आहेत. रोहितने गाडी चालवली ती जागा अतिशय वर्दळीची होती आणि ओव्हरस्पीडिंग करून रोहित स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत होता, असेही सांगण्यात आले. विश्वचषकादरम्यान रोहितने पोलिस सुरक्षेत टीम बसमधून प्रवास करावा, असा सल्लाही त्याला देण्यात आला होता.
हेही वाचा – IND Vs BAN : बांगलादेशचा कॅप्टन बदलला, भारताची पहिली बॉलिंग!
टीम इंडिया आज 19 ऑक्टोबर रोजी पुण्यात बांगलादेश विरुद्ध (IND vs BAN) एकदिवसीय विश्वचषक सामना खेळत आहे. रोहितने मुंबईतूनच देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि त्याचे घर मुंबईतच आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!