वयाच्या 43व्या वर्षी वर्ल्ड नंबर 1 टेनिसपटू! भारताच्या रोहन बोपण्णाचा पराक्रम

WhatsApp Group

भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णाने (Rohan Bopanna) इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेनसह त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत धडक दिली. या दोघांनी मिळून पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी या जोडीचा पराभव केला. रोहन आणि एबडेन यांनी अर्जेंटिनाच्या जोडीचा 6-4, 7-6(7-5) अशा फरकाने पराभव केला.

बोपण्णाने पुरुष दुहेरी टेनिस क्रमवारीत अव्वल स्थान गाठले. त्याने प्रथमच ही कामगिरी केली. विशेष म्हणजे वयाच्या 43 व्या वर्षी तो पहिल्यांदाच टॉपवर पोहोचला आहे. बोपण्णा प्रथमच नंबर-1 बनणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.

राजीव रामचा विक्रम मोडला

बोपन्नाने अमेरिकेच्या राजीव रामला हरवून नवा विक्रम रचला. राजीव राम त्याच्या कारकिर्दीत ऑक्टोबर 2022 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी प्रथमच शीर्षस्थानी पोहोचले आणि त्यांनी ग्रेट ब्रिटनचे सहकारी जो सॅलिसबरी यांना मागे टाकले.

मेलबर्न पार्क येथे सलग 17वी स्पर्धा खेळत असलेल्या बोपण्णाने कोर्ट 3 वर विजय मिळवून कारकिर्दीत प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरी गाठली. तिसरी फेरी गाठणे ही त्यांची मागील सर्वोत्तम कामगिरी होती. सहा वेळा तो उपांत्यपूर्व फेरीत बाहेर पडला. स्पर्धा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी बोपण्णा नव्या क्रमवारीत अव्वल स्थानावर दिसणार आहे. बोपण्णा आणि एबडेन ही जोडी गेल्या वर्षी यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत झाली होती. चार महिन्यांनंतर दोघेही पुन्हा ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत पोहोचले.

हेही वाचा – Petrol Diesel Rate (24 January 2024) : आज पेट्रोल आणि डिझेल महाग की स्वस्त? जाणून घ्या इंधनाची नवीन किंमत

बोपण्णाच्या या विजयाने सर्व ग्रँडस्लॅममध्ये किमान उपांत्य फेरी गाठण्याचा विक्रम पूर्ण केला आहे. 2011, 2016, 2018 आणि 2021 मध्ये चार उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर बोपण्णाने 2022 मध्ये मॅटवे मिडेलकूपसह फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली. विम्बल्डनमध्ये त्याने 2013, 2015 आणि 2023 मध्ये तीन वेळा उपांत्य फेरी गाठली होती. त्याच वेळी, तो दोनदा (2010 आणि 2023) यूएस ओपनमध्ये अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याला आतापर्यंत दुहेरीत एकही ग्रँडस्लॅम जिंकता आलेले नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment