गांगुली सोडणार BCCI चं अध्यक्षपद..! ‘हा’ वर्ल्डकपविजेता खेळाडू होणार नवा ‘बॉस’?

WhatsApp Group

BCCI New President : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नवा अध्यक्ष मिळू शकतो. टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली २०१९ मध्ये बोर्डाचा अध्यक्ष बनला होता, पण तो राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील (एजीएम) राज्य संघटना प्रतिनिधींची यादी बाहेर आली आहे. त्यात अनेक आश्चर्यकारक नावे आहेत. या यादीत समाविष्ट असलेली व्यक्तीच बीसीसीआयची निवडणूक लढवू शकते.

रॉजर बिन्नी यांच्या नावाचा समावेश!

१९८३ चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेले वेगवान गोलंदाज रॉजर बिन्नी यांच्या नावाचा समावेश प्रतिनिधींमध्ये करण्यात आला आहे. आतापर्यंत कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सचिव संतोष मेनन एजीएममध्ये सहभागी होत असत. आता त्यांच्या जागी रॉजर बिन्नींच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. बिन्नी यांचे नाव बीसीसीआयमध्ये मोठे पद मिळणार असल्याने त्यांना देण्यात आले आहे. ते भारतीय संघाचे मुख्य निवडकर्तेही राहिले आहेत.

हेही वाचा – Nobel Peace Prize 2022 : जेलमध्ये असलेल्या ‘त्या’ व्यक्तीला शांततेचा नोबेल पुरस्कार..!

फक्त रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. यात अविशेक दालमिया यांचेही नाव नाही. ते बीसीसीआयमधील पदाचे दावेदार असल्याचे मानले जात होते. एजीएममध्ये सौरव गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे प्रतिनिधी बनल्याने, आता हे स्पष्ट झाले आहे की बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा मुलगा बोर्डाच्या पुढील व्यवस्थेचा भाग असणार नाही.

गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जय शाह बोर्डात सचिवच्या भूमिकेत राहू शकतात. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशचे अरुणसिंह धुमाळ हे खजिनदारपदासाठीच दावा मांडणार आहेत. देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा मुलगा रोहन जेटली यांना बोर्ड किंवा आयपीएलमध्ये मोठी भूमिका मिळू शकते. यासोबतच राजीव शुक्ला आणि अनिरुद्ध चौधरी हेही या पदाच्या शर्यतीत आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment