Rishabh Pant : आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ लवकरच श्रीलंकेला रवाना होणार आहे. श्रीलंकेला जाण्यापूर्वी खेळाडू बंगळुरूमधील अलूर येथे प्रशिक्षण शिबिरात सहभागी होत आहेत. सर्व खेळाडूंची फिटनेस चाचणीही येथे झाली. सोमवारी संघाच्या प्रशिक्षण सत्रात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही उपस्थित होता.
पंत सध्या एनसीएमध्ये रिहॅबमध्ये आहे. तो पुन्हा टीम इंडियात परतण्याच्या तयारीत व्यस्त आहे. पुनरागमन केव्हा होईल हे निश्चित नाही पण पंतची फिटनेस हळूहळू सुधारत आहे. सोमवारी पंत सहकाऱ्यांना भेटण्यासाठी अलूरला पोहोचा. बीसीसीआयने इंस्टाग्रामवर यासंबंधीचा एक अतिशय सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
हेही वाचा – “भारत चंद्रावर पोहोचला तर काय झालं, आम्हीही…”, पाकिस्तानी अँकरचा व्हिडिओ व्हायरल!
गुडघ्यावर पट्टी बांधून पंत मैदानावर पोहोचला. त्याला पाहताच सराव करत असलेला फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा चेहरा फुलला. पंत येताच त्याने मिठी मारली. यानंतर पंत अष्टपैलू शार्दुल ठाकूरसोबत बसलेला दिसला. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही पंतसोबत वेळ घालवताना दिसला. पंत आपल्या सहकाऱ्यांना भेटून खूप आनंदी दिसत होता.
यापूर्वी ऋषभ पंतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंत सायकल चालवताना दिसत आहे. पंतच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या. ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरनेही त्याच्या या व्हिडिओवर आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!