Rishabh Pant : 2022 च्या अखेरीस भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत एका मोठ्या कार अपघातात गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. आता ऋषभ पंत लवकरच भारतीय संघाची जर्सी परिधान करताना दिसणार आहे, कारण तो बरा होत आहे आणि त्या भीषण कार अपघातानंतर ऋषभ पंत प्रथमच फलंदाजी करताना दिसला. टीम इंडियासाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे.
ऋषभ पंत दिल्लीत फलंदाजी करताना दिसला. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ऋषभ पंत मैदानावर जाताना मैदानाची पूजा करत आहे आणि नंतर फलंदाजीला जात आहे. ऋषभ पंत क्रीजवर येतो आणि तो काही शॉट्स खेळतो. मात्र, तो फारसा धावपळ करताना दिसला नाही. या व्हिडिओवरून असे सूचित करण्यात आले आहे की कार अपघातानंतर ऋषभ पंतची रिकव्हरी खूप वेगाने होत आहे आणि तो लवकरच क्रिकेट अॅक्शनमध्ये दिसू शकतो. तो एनसीएमध्ये वेळ घालवत आहे.
Rishabh Pant is back on the ground, he is batting in a match on Independence Day – This video & visuals will bring happiness in everyone's face.
Video of the day! pic.twitter.com/PW0GnoCYCd
— CricketMAN2 (@ImTanujSingh) August 16, 2023
हेही वाचा – विराट कोहलीची ताकद बघा, ‘त्या’ मीडिया संस्थेला फेक न्यूजनंतर लाखोंचा फटका!
2023 च्या विश्वचषकापर्यंत तो तंदुरुस्त नसला तरी विश्वचषकानंतर जेव्हा भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल तेव्हा तो बरा असेल असे समजले जात आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नियमित खेळत असताना ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे भारताच्या कसोटी संघाला मोठा फटका बसला आहे. आता आपण केएल राहुल, इशान किशन किंवा संजू सॅमसन यष्टीरक्षक फलंदाजाच्या भूमिकेत पाहू शकतो. विश्वचषक 2023 आणि आशिया चषक स्पर्धेसाठी संघ अद्याप जाहीर झालेला नाही.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!