लाइव्ह मुलाखतीत ऋषभ पंत आणि हर्षा भोगलेमध्ये वाद..! Video झाला व्हायरल

WhatsApp Group

Rishabh Pant And Harsha Bhogle Interview : टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंतच्या न्यूझीलंड दौऱ्यावरच्या खराब फॉर्मवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. ऋषभ पंतला प्लेइंग-११ मध्ये संधी मिळत असून संजू सॅमसनला बाहेर बसावे लागले आहे. सतत निशाणा साधला जात असताना, ऋषभ पंतने स्वत: त्याच्या फॉर्मबद्दल बोलले आहे आणि थेट म्हटले आहे की माझे नंबर देखील खराब नाहीत. समालोचक हर्षा भोगले यांच्या मुलाखतीत ऋषभ पंत काहीसा नाराज असल्याचे दिसले, मात्र हे विधान केल्यानंतर काही वेळातच तिसऱ्या वनडेत ऋषभ पंत केवळ १० धावा करून बाद झाला.

सामन्यापूर्वी समालोचक हर्षा भोगलेने ऋषभ पंतशी संवाद साधला. ऋषभने येथे सांगितले की, मला टी-२० क्रिकेटमध्ये सलामी द्यायला आवडेल, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ किंवा ५ क्रमांक बरोबर आहे आणि कसोटीमध्ये मी ५ क्रमांकावर फलंदाजी करतो. पण प्रशिक्षक आणि कर्णधार संघासाठी कसा चांगला विचार करतात यावर गोष्टी अवलंबून असतात. मला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.

हेही वाचा – Petrol-Diesel Price Today : ६ महिन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? वाचा तुमच्या शहरातील नवीन दर

”आता माझी तुलना करू नका”

संभाषणादरम्यान, जेव्हा हर्षा भोगले म्हणाले की, तुझी संख्या कसोटीत चांगली आहे, पण एकदिवसीय आणि टी-२० मध्ये इतकी चांगली नाही. ज्यावर ऋषभ पंत म्हणाला, ”पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये माझे आकडे इतके वाईट नाहीत, मी फक्त २४-२५ वर्षांचा आहे आणि अशा परिस्थितीत तुलना करणे योग्य नाही. माझे वय ३०-३२ असेल तेव्हा अशी तुलना करता येईल.” यादरम्यान ऋषभ पंत अस्वस्थ होताना दिसला आणि हर्षा भोगलेला उत्तर देताना त्याचा सूर बदलला.

ऋषभ पंतची ही मुलाखत व्हायरल झाली आणि तो समालोचक हर्षा भोगले यांच्याशी बोलण्याचा प्रकार लोकांना आवडला नाही. ऋषभ पंतचा हा अहंकार आहे, जो त्याने हाताळावा, असे अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी म्हटले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment