सिक्सर किंग रिंकू सिंहचा धमाका! 18व्यांदा मारल्या 50 हून अधिक धावा

WhatsApp Group

Rinku Singh : स्टार क्रिकेटर रिंकू सिंहने IPL 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्याला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. दरम्यान, या 25 वर्षीय रिंकू सिंहने सोमवारी लिस्ट-ए स्पर्धेत देवधर ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा फलंदाजी करत संघाला संकटातून बाहेर काढले. लिस्ट-ए कारकिर्दीत त्याने 18व्यांदा 50 हून अधिक धावांची इनिंग खेळली. मध्य विभागाकडून खेळणाऱ्या रिंकूने पूर्व विभागाविरुद्ध 63 चेंडूत 54 धावांची खेळी केली. 50 षटकांत 207 धावा करून संघ बाद झाला.

रिंकू सिंह फलंदाजीला आला तेव्हा मध्य विभागाचा संघ 118 धावांवर 4 गडी गमावून संघर्ष करत होता. रिंकूने कर्ण शर्मासोबत 5व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रिंकूने 63 चेंडूत 54 धावा केल्या. 2 चौकार आणि 1 षटकार मारला. स्ट्राइक रेट 86 होता. त्याला वेगवान गोलंदाज मुरा सिंहने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कर्ण शमानेही 32 चेंडूत 32 धावा केल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार रिंकूची पुढील महिन्यात आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघात निवड केली जाऊ शकते. यासह तो आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.

हेही वाचा – Pune Lavasa City : भारतातील पहिलं खासगी हिल स्टेशन लवासाची 1,814 कोटींना विक्री

प्रत्येक तिसऱ्या डावात 50 पेक्षा जास्त धावा

यूपीच्या रिंकू सिंहने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यापूर्वी त्याने 46 डावात एक शतक आणि 16 अर्धशतकांच्या मदतीने 1749 धावा केल्या होत्या. 104 धावा ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. म्हणजेच त्याने 47 डावात 18 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रिंकूने 63 प्रथम श्रेणी डावांमध्ये 7 शतके आणि 19 अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद 163 ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

आयपीएल 2003 मध्ये, रिंकू सिंह 20व्या षटकात सलग 5 षटकार ठोकून प्रसिद्धीझोतात आला. त्याने आतापर्यंत 89 टी-20 सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 1768 धावा केल्या आहेत. 10 अर्धशतके केली आहेत. 79 धावा ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचा स्ट्राइक रेट 141 आहे, जो T20 च्या दृष्टीने सर्वोत्तम आहे. त्याने 80 षटकारही मारले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment