Asia Cup 2022 : टीम इंडियाला जबर धक्का..! रवींद्र जडेजा स्पर्धेबाहेर; ‘या’ अष्टपैलू खेळाडूला संधी!

WhatsApp Group

Asia Cup 2022 : आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धा खेळणाऱ्या टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळं उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयनं एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली. जडेजानं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीत शानदार खेळ दाखवत ३५ धावांची इनिंग खेळली. “अखिल भारतीय निवड समितीने सध्या सुरू असलेल्या आशिया चषकासाठी रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलची निवड केली आहे,” असं बीसीसीआयनं म्हटले.

रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्यानं तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्याची जागा घेणारा अक्षर पटेल ज्याला याआधी संघात स्टँडबाय म्हणून स्थान देण्यात आलं होतं, तो लवकरच दुबईत संघात सामील होणार आहे. आयपीएल २०२२मध्ये देखील रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती त्यामुळे त्याला काही सामन्यांमधून बाहेर व्हावं लागलं होतं. त्यानंतर जडेजाने इंग्लंड दौऱ्यातून मैदानात पुनरागमन केलं. तेव्हापासून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आता त्याची एक्झिट हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा – …आणि नदालच्या नाकातून रक्त वाहू लागलं! लाइव्ह मॅचमध्ये काय घडलं? इथं पाहा VIDEO

अक्षरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

रवींद्र जडेजाच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या अक्षर पटेलकडून भारतीय चाहत्यांना आता चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या विंडीज दौऱ्यावरील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अक्षरनं नाबाद ६४ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्या सामन्यात ३११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं ८० धावांच्या आत तीन विकेट गमावल्या होत्या. मात्र श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्या शानदार फलंदाजीने भारताला विजय मिळवून दिला. अक्षरनं टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही प्रभावी कामगिरी करत एकूण सात विकेट्स घेऊन मालिका संपवली.

आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment