टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या दुखापतग्रस्त असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) तो यातून सावरत आहे. 35 वर्षीय जडेजाने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली. दरम्यान, शुक्रवारी तो अचानक प्रकाशझोतात आला, जेव्हा त्याचे वडील अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी त्याच्याबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. जडेजाच्या वडिलांनी आपला मुलगा रवींद्र आणि सून रिवाबा यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले.
वडिलांची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होताच जडेजाने आपले मौन तोडले. वडील अनिरुद्ध सिंह जडेजाच्या मुलाखतीला त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे. वडिलांनी मुलाखतीत जे बोलले होते ते जडेजाने पूर्णपणे नाकारले. त्याचबरोबर या मुलाखतीतून पत्नी रिवाबाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्याने सांगितले. स्क्रिप्टेड मुलाखतीत जे काही बोलले होते, त्याकडे दुर्लक्ष करा, असे जडेजा म्हणाला.
जडेजाने गुजरातीमध्ये लिहिले, ”दिव्य भास्करमध्ये प्रकाशित झालेल्या निरर्थक मुलाखतीत जे काही बोलले गेले ते चुकीचे आणि अर्थहीन आहे. फक्त एका बाजूचा मुद्दा मांडला आहे, ज्याचा मी खंडन करतो. माझ्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे अत्यंत निंदनीय आणि अशोभनीय आहे. माझ्याकडेही बरेच काही सांगायचे आहे जे मी जाहीरपणे न बोलल्यास चांगले होईल, धन्यवाद.”
रवींद्र जडेजाचा जन्म 6 डिसेंबर 1998 रोजी झाला. 17 एप्रिल 2016 रोजी राजकोटमधील रिवाबासोबत त्याचा विवाह झाला होता. जडेजा नुकताच हैदराबाद कसोटीत इंग्लंडविरुद्ध खेळताना दिसला होता. जिथे तो दुखापतग्रस्त झाला. आता तो इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळेल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा – एकसाथ तीन भारतरत्न! पंतप्रधान मोदींची सोशल मीडियावर ‘मोठी’ घोषणा
जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा सध्या जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत. 8 डिसेंबर 2022 रोजी त्या आमदार म्हणून निवडून आल्या.
वडील अनिरुद्ध सिंह यांनी अनेक गंभीर आरोप केले. ते म्हणाले, ”आता त्याच्याशी (मुलगा) कोणताही संबंध नाही. त्याला क्रिकेटर बनवले नसते तर बरे झाले असते, तर जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिला फक्त पैशांचा संबंध आहे”
ते म्हणाले, ”रवींद्र आणि त्यांची पत्नी रिवाबा यांच्याशी त्यांचा कोणताही संबंध नाही. त्याने लग्न केले नसते तर बरे झाले असते, तो क्रिकेटर झाला नसता, तर बरे झाले असते. आपण आपला मुलगा जडेजाचा क्रिकेटर व्हावा यासाठी काळजी घेतली. बहीण नयना बा यांनीही त्याला खूप साथ दिली.”
हॉटेलमुळे रिवाबाशी वाद
अनिरुद्ध म्हणाले, की आम्ही त्यांना फोन करत नाही, ते आम्हाला फोन करत नाहीत. त्याच्या (रवींद्र) लग्नानंतर दोन-तीन महिन्यांनीच वाद होऊ लागले. त्यांना 20 हजार रुपये पेन्शन मिळते. असा खर्च भागवला जातो. लग्नानंतर रिवाबाला हॉटेल आपल्या नावावर करायचे होते, यामुळे संबंध बिघडले.
रवींद्रच्या वडिलांनी सांगितले की, ते जामनगरमधील 2BHK फ्लॅटमध्ये 10 वर्षांहून अधिक काळ एकटेच राहतात. त्यांचा मुलगा वेगळा राहतो. रिवाबाने त्याच्यावर काय जादू केली माहीत नाही. त्याच्या सासूचा मुलगा रवींद्रच्या आयुष्यात खूप ढवळाढवळ आहे, त्यामुळेच त्यांनी पाच वर्षांपासून आपल्या नातवाचे तोंडही पाहिले नाही.
जडेजाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
- 69 कसोटी, 2893 धावा, 280 विकेट्स
- 197 वनडे, 2756 धावा, 220 विकेट्स
- 66 टी-20, 480 धावा, 53 विकेट्स
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!