‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूरचे SIX ठोकून शतक..! पाहा दमदार सेलिब्रेशनचा व्हिडिओ🔥💯

WhatsApp Group

Ranji Trophy | भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर हळूहळू फॉर्ममध्ये परतत आहे. टीम इंडियातून वगळण्यात आलेला शार्दुल सध्या आयपीएलपूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे. शार्दुलने तामिळनाडूविरुद्धच्या उपांत्य फेरीत मुंबईसाठी स्फोटक शतक झळकावले (Shardul Thakur Century) आणि आपल्या संघाला संकटातून बाहेर काढले आणि मजबूत स्थितीत आणले. त्याने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. शार्दुल ठाकूरने आपल्या 81व्या प्रथम श्रेणी सामन्यात पहिले शतक झळकावले. शार्दुल 91 धावांवर असताना त्याने चौकार मारून धावसंख्या 95 पर्यंत नेली. यानंतर त्याने आपल्याच शैलीत षटकार ठोकत शतक पूर्ण केले. मात्र, या काळातही त्याचे सेलिब्रेशन चर्चेत राहिले.

9व्या क्रमांकावर आलेल्या शार्दुल ठाकूरने 104 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकारांसह 109 धावा केल्या. षटकाराद्वारे शतक झळकावल्यानंतर शार्दुलने हवेत झेप घेतली आणि मग हवेत पंच मारला आणि मुंबईच्या ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवले. संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेनेही टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. शार्दुलने आधी गोलंदाजीत 2 बळी घेतले आणि नंतर फलंदाजीतही कमाल केली. शार्दुलने पहिल्या डावात 2 बळी घेतले.

हेही वाचा – IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जचा ‘स्टार’ खेळाडू आयपीएलमधून बाहेर!

तामिळनाडूला पहिल्या डावात 146 धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईने पहिल्या डावात 9 बाद 353 धावा केल्या आहेत. मुंबईची आघाडी 207 धावांची आहे. मुंबईला मोठी आघाडी देण्यात शार्दुल ठाकूरने महत्त्वाची भूमिका बजावली. रणजी ट्रॉफीनंतर त्याचे संपूर्ण लक्ष आता आयपीएलवर असेल.

शार्दुल ठाकूरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

32 वर्षीय शार्दुलने 11 कसोटी, 47 एकदिवसीय आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने त्याचा शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सेंच्युरियनमध्ये यजमान संघाविरुद्ध खेळला. मात्र, त्या कसोटीत त्याची कामगिरी काही विशेष झाली नाही. सेंच्युरियन कसोटी सामन्यात भारताला डावाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या कसोटीच्या पहिल्या डावात शार्दुलने 19 षटकांत 101 धावा दिल्या. त्याबदल्यात त्याला एक विकेट मिळाली. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment