Ranji Trophy : अजिंक्य रहाणेची डबल सेंच्युरी..! ठोकले २६ चौकार आणि ३ षटकार; केलं ‘असं’ सेलिब्रेशन!

WhatsApp Group

Ajinkya Rahane Double Century : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा, रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2022-23) देशभरात आयोजित केली जात आहे. यामध्ये अनेक दिग्गज आणि युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकत आहेत आणि भारतीय संघात निवडीसाठी आपला दावा ठोकत आहेत. या भागात, महाराष्ट्र आणि हैदराबाद यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात, अनुभवी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने धडाकेबाज खेळी खेळताना २०४ धावा केल्या. रहाणेने आपल्या द्विशतक खेळीत २६ चौकार आणि ३ षटकार मारले.

अजिंक्य रहाणे एकेकाळी भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग मानला जात होता. पण २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ने जिंकल्यापासून तो अतिशय खराब फॉर्मशी झुंजत होता. त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. जानेवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो शेवटचा खेळला होता. या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने एकूण १० धावा केल्या. त्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता या खेळीमुळे त्याने फॉर्ममध्ये परतल्याचे दाखवून दिले आहे. यासह, या खेळीतून रहाणेवर आगामी आयपीएल २०२३ च्या लिलावाकडेही लक्ष असेल.

हेही वाचा – Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! भारतात अलर्ट; आरोग्य मंत्रालयानं राज्यांना सांगितलं…

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बातमी लिहिपर्यंत मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १२४ षटकात ५ बाद ६३६ धावा केल्या आहेत. संघासाठी रहाणेची पहिली सलामीवीर यशस्वी जयस्वालनेही दमदार खेळी केली. त्याने २७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १६२ धावा करत हैदराबादच्या गोलंदाजांची अवस्था बिघडवली. सूर्यकुमार यादवने ९० तर सरफराज खानने १२३ धावा केल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment