राहुल द्रविडच्या मुलाला लॉटरी! ‘या’ संघाने ऑक्शनमध्ये घेतलं विकत, पाहा Video

WhatsApp Group

Rahul Dravid’s Son Samit : टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा माजी भारतीय कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यांचा मुलगा समित द्रविडने गुरुवार, 25 जुलै रोजी बंगळुरू येथे झालेल्या महाराजा करंडक KSCA T20 लिलाव जिंकला आहे. समित द्रविडला राज्य क्रिकेटमधील पहिला करार मिळाला आहे. समित द्रविडला गेल्या मोसमातील उपविजेता संघ म्हैसूर वॉरियर्सने विकत घेतले आहे.

म्हैसूर वॉरियर्सचे नेतृत्व करुण नायर करेल, जो भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळला आहे आणि त्याने त्रिशतकही केले आहे. गेल्या वर्षीही त्याने संघाचे नेतृत्व केले होते. म्हैसूर संघाने अष्टपैलू कृष्णप्पा गौतमला 7.4 लाख रुपयांना आणि जे सुचितला 4.8 लाख रुपयांना खरेदी केले आहे, तर याच संघाने वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला 1 लाख रुपयांना खरेदी केले आहे. गेल्या मोसमात गुलबर्गा मिस्टिक्सकडून खेळलेला विकेटकीपर फलंदाज एलआर चेतन हा लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.

हेही वाचा – कारगिलला कसे जाता येईल, LOC वर जाण्याची परवानगी कुठपर्यंत? जाणून घ्या ही माहिती

एलआर चेतनला बंगळुरू ब्लास्टर्सने 8.2 लाख रुपयांना विकत घेतले. मयंक अग्रवाल बंगळुरू ब्लास्टर्सचा कर्णधार होणार आहे. संघाने त्याला आधीच कायम ठेवले होते. त्यांच्याशिवाय सूरज आहुजा, शुभांग हेगडे आणि मोहसीन खान हे देखील बंगळुरूकडून खेळताना दिसणार आहेत. लेगस्पिनर श्रेयस गोपालला मंगळुरु ड्रॅगन्सने 7.6 लाख रुपयांना विकत घेतले आहे. देवदत्त पडिक्कल गुलबर्गासाठी खेळताना दिसणार आहे. संघाने त्याला कायम ठेवले आहे. महाराजा ट्रॉफीचा 2024 हंगाम बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment