राहुल द्रविडची सॅलरी किती? तो कधीपर्यंत भारताचा कोच राहणार? वाचा!

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राहुल द्रविडचा (Rahul Dravid) टीम इंडियाचा हेड कोच म्हणून कार्यकाल वाढवला आहे. द्रविडचा दुसरा टर्म किती काळ आहे याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतेही अपडेट दिलेले नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, द्रविड पुढील वर्षी म्हणजेच जून 2024 टी-20 वर्ल्डकपपर्यंत टीम इंडियाचा प्रशिक्षक राहू शकतो. द्रविडच्या कोचिंगखाली भारतीय संघाने अलीकडेच आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता, जिथे त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

भारतीय क्रिकेट बोर्डाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि टीम इंडियाच्या (वरिष्ठ पुरुष) सपोर्ट स्टाफच्या कराराच्या मुदतवाढीची घोषणा केली आहे. विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बोर्डाने त्याच्याशी चर्चा केली आणि त्याचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

वर्ल्डकप 2023 च्या फायनलनंतर द्रविडचा कार्यकाळ संपला. प्रशिक्षक म्हणून त्याला बीसीसीआयकडून वार्षिक 10-12 कोटी रुपये मानधन मिळत असे. द्रविडचा पगार त्याच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी वाढल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत भारतीय क्रिकेट बोर्डाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा – गरजेच्या वेळी लागणारे इमर्जन्सी नंबर्स, तुमच्याकडे Save करून ठेवा!

2021 मध्ये राहुल द्रविड पहिल्यांदाच टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला. त्यांचा पहिला कार्यकाळ दोन वर्षांचा होता. द्रविड प्रशिक्षक असताना, भारतीय संघ आशिया कप 2023 जिंकण्यात यशस्वी झाला, तर टीम इंडियाला वनडे वर्ल्डकप आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. टी-20 विश्वचषक जून 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. द्रविडच्या कराराच्या मुदतवाढीनंतर व्हीव्हीएस लक्ष्मण एनसीएमध्ये संचालकपदावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment