OMG..! पाकिस्तानविरुद्धच्या मॅचपूर्वी भारताला ४४० व्होल्टचा धक्का; द्रविडची साथ तुटणार?

WhatsApp Group

Rahul Dravid COVID 19 Positive : आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून, तो आशिया चषक स्पर्धेत जाऊ शकेल की नाही याबाबत अजूनही शंका आहे. टीम इंडिया आज यूएईला रवाना होणार आहे. आशिया चषक या शनिवारपासून म्हणजेच २७ ऑगस्टपासून सुरू होत असून भारताचा सामना २८ तारखेला पाकिस्तानशी होणार आहे.

नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर राहुल द्रविडही ब्रेकवर होता. एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेला पोहोचलेल्या केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाचा प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ((NCA) संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण होता. राहुल आणि लक्ष्मण यांनी झिम्बाब्वेविरुद्ध क्लीन स्वीप केला. भारतीय संघानं सोमवारी मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या वनडेत झिम्बाब्वेवर १३ धावांनी विजय मिळवला. अशाप्रकारे भारतानं एकदिवसीय मालिकेत झिम्बाब्वेचा ३-० असा पराभव केला.

हेही वाचा – “मला तुझी जर्सी दे”, चाहत्याची मागणी ऐकताच शिखर धवननं काय केलं बघा; तुम्हीही हसाल!

भारत-पाकिस्तान सामना

२७ ऑगस्टपासून यूएईमध्ये आशिया कपला सुरुवात होणार आहे. २८ ऑगस्ट रोजी भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे.

आशिया कपमध्ये द्रविड नसणार?

टीम इंडियासाठी कठीण गोष्ट म्हणजे राहुल द्रविड आता कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे आणि अशा परिस्थितीत आशिया कपमध्ये टीम इंडियासोबत उपस्थित राहणं त्याच्यासाठी खूप कठीण आहे. कारण जोपर्यंत तो निगेटिव्ह येत नाही आणि त्यानंतर तो फिट होत नाही तोपर्यंत तो संघात सामील होऊ शकणार नाही. अशा स्थितीत आशिया कपमध्ये राहुल द्रविडऐवजी लक्ष्मण संघासोबत प्रवास करणार का, हा मोठा प्रश्न आहे.

हेही वाचा – “चार ठिकाणी बॉम्ब ठेवलाय..”, मुंबईच्या ‘या’ हॉटेलला मिळाली घातपाताची धमकी!

राहुल द्रविडची गणना भारताच्या सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये केली जाते. टीम इंडियाचा माजी कर्णधार असलेल्या द्रविडनं देशासाठी १६४ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर १३२८८ धावा आहेत. द्रविडची कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीची सरासरी ५२.३१ आहे. त्याच वेळी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील, त्याने ३४४ सामन्यांमध्ये १०८८९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी ४०च्या आसपास आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

स्टँडबाय : श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment