आयपीएल 2025 मध्ये राहुल द्रविड ‘या’ संघाचा हेड कोच!

WhatsApp Group

Rahul Dravid : भारतीय क्रिकेट संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकून संपला. द्रविडचा टीम इंडियासोबतचा करार या स्पर्धेपर्यंत होता. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक फायनलमधील पराभवानंतर बीसीसीआयने त्याचा करार टी-20 वर्ल्डकपपर्यंत वाढवला होता. या स्पर्धेनंतर त्याने टीम इंडियाचा निरोप घेतला. आता तो इंडियन प्रीमियर लीग फ्रेंचायझी संघ राजस्थान रॉयल्ससोबत काम करू शकतो. राजस्थानने 2008 मध्ये खेळलेली पहिली आयपीएल जिंकली होती.

राहुल द्रविड आता कोणत्या संघासोबत काम करणार हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राहुल द्रविड इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून परत येऊ शकतो. तो त्याच्या जुन्या संघ राजस्थान रॉयल्समध्ये सामील होऊ शकतो. या संघाकडून खेळलेल्या राहुल द्रविडने दीर्घकाळ कर्णधार म्हणून फ्रेंचायझीची सेवा केली आहे. सध्या राजस्थान संघाशी चर्चा सुरू असून लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा – सिक्स मारण्यावर बॅन, मारलाच तर फलंदाज आऊट! क्रिकेटमध्ये ‘नवा’ नियम

राजस्थानसोबत राहुलची कारकीर्द

51 वर्षीय राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार म्हणून खेळला आहे. त्याने 2013 च्या चॅम्पियन्स लीग टी-20 फायनलमध्ये संघाला नेले होते. द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थानच्या संघानेही प्लेऑफ खेळला. 2014 आणि 2015 मध्ये त्यांनी या टीमसोबत मेंटॉर म्हणून काम केले आहे. या मोसमात संघाने तिसरे स्थान पटकावले होते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment