…आणि नदालच्या नाकातून रक्त वाहू लागलं! लाइव्ह मॅचमध्ये काय घडलं? इथं पाहा VIDEO

WhatsApp Group

Rafael Nadal US Open 2022 : स्पेनचा दिग्गज टेनिस स्टार राफेल नदालनं यूएस ओपन २०२२ मध्ये आपला शानदार प्रवास सुरू ठेवला आहे. दुसऱ्या फेरीत त्यानं दणदणीत विजयाची नोंद केली. मात्र याचदरम्यान नदालचा एक अपघात झाला. नदालच्या नाकाला दुखापत झाली. वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा यूएस ओपनमध्ये दुसऱ्या फेरीचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्याचा सामना इटलीच्या फॅबियो फोगनिनीशी झाला. या सामन्यात नदालची रॅकेट चुकून त्याच्या नाकाला लागली, त्यामुळं नाकातून रक्त वाहू लागलं.

नक्की काय घडलं?

चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा नदालला दुखापत झाली तेव्हा त्यानं जवळपास सामना जिंकला होता. नदालनं पहिला सेट २-६ असा गमावला. यानंतर त्यानं पुढील तीन सेटमध्ये पुनरागमन केलं आणि शेवटचे तीन सेट ६-४, ६-२, ६-१ने जिंकून सामना खिशात टाकला. दरम्यान, चौथ्या सेटमध्ये शॉट वाचवण्याच्या प्रयत्नात नदालचं रॅकेट चुकून त्याच्याच नाकावर आदळलं. त्यामुळं त्याच्या नाकातून रक्त वाहू लागलं. मात्र, कोर्टात नदालच्या नाकावर मलमपट्टी करण्यात आली. यानंतर त्यानं चौथा सेटही खेळला आणि सामना जिंकला.

हेही वाचा – VIDEO : सर्फिंग, बोटिंग आणि..! समुद्रकिनारी भारतीय क्रिकेटपटूंची धमाल; द्रविडनं आखला प्लान!

काय म्हणाला नदाल?

नदाल सध्या जगातील सर्वाधिक २२ वेळा ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू आहे. या घटनेमुळे आर्थर ऐस स्टेडियममध्ये विचित्र परिस्थिती निर्माण झाली आणि खेळ सुमारे १५ मिनिटं थांबवण्यात आला. नदालनं लगेचच दोन्ही हातांनी तोंड झाकलं आणि सामना संपल्यानंतर या घटनेबद्दल मजेशीरपणे वक्तव्य केलं. नदालला विचारण्यात आलं की, अशी घटना त्याच्यासोबत यापूर्वी घडली आहे का. यावर तो गमतीने म्हणाला, ”हे गोल्फ कोर्सवर घडलंय, परंतु टेनिस रॅकेटसोबत आधी असं कधीही घडलं नाही. सुरुवातीला थोडी चक्कर आल्यासारखं वाटलं. नंतर थोडासा त्रास झाला.”

नदालनं दुसऱ्या फेरीत बाजी मारली आहे. आता तिसऱ्या दौऱ्यात त्याचा सामना फ्रान्सचा अनुभवी खेळाडू रिचर्ड गॅस्केट याच्याशी होणार आहे. आत्तापर्यंत नदाल आणि गॅस्केट यांच्यात १७ सामने खेळले गेले आहेत. नदालनं प्रत्येक सामना जिंकला आहे. अशा स्थितीत या सामन्यात नदालचं पारडं जड असल्याचं दिसत आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment