कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तीन सामन्यांत 100 धावाही करू न शकलेल्या न्यूझीलंडच्या युवा रचिन रवींद्रने द्विशतक झळकावून धमाका केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात (NZ vs SA 1st Test) रचिन रवींद्रने संघासाठी अप्रतिम खेळी केली आहे. कर्णधार केन विल्यमसनसोबत त्याने (Rachin Ravindra) अशी भागीदारी केली ज्याच्या जोरावर किवी संघाला 500 धावांचा पल्ला गाठता आला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली आहे. पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या दोन धक्क्यांनंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह रचिन रवींद्रने संघाला संकटातून बाहेर काढले. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 232 धावांची भागीदारी केली.
अवघ्या चौथ्या कसोटीत द्विशतक
आपल्या कारकिर्दीतील केवळ चौथा कसोटी सामना खेळणाऱ्या रचिन रवींद्रने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम खेळी केली. पहिल्या दिवसाच्या खेळात त्याने 120 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर 189 चेंडूंचा सामना करत 10 चौकार आणि 1 षटकारासह शतक झळकावले. दुसऱ्या दिवसाच्या खेळात रचिनने 270 चेंडू खेळून 18 चौकारांसह 150 धावा पूर्ण केल्या. 340 चेंडूत 21 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले.
हेही वाचा – एक सामान्य मुलगा ते यशस्वी वायरमन, सिंधुदुर्गच्या ज्ञानेश्वर गोसावीचा प्रेरणादायी प्रवास
छोट्या कारकिर्दीत मोठा धमाका
रचिन रवींद्रने गेल्या काही महिन्यांत न्यूझीलंडसाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात त्याने 10 सामन्यांमध्ये 578 धावा केल्या ज्यात 3 शतकी खेळी आहेत. पहिल्या तीन कसोटी सामन्यात केवळ 73 धावा करणाऱ्या रचिनने चौथ्या सामन्यात द्विशतक झळकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली. रचिननने 26 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 240 धावा केल्या.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!