Praggnanandhaa defeats Magnus Carlsen : १७ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद (रमेशबाबू प्रज्ञानंद) नं मियामी येथे सुरू असलेल्या FTX क्रिप्टो कपमध्ये पाच वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. प्रज्ञानंदनं ६ महिन्यांत तिसऱ्यांदा विश्वविजेत्या कार्लसनचा पराभव केला आहे. नियमन गेमअखेर स्कोअर २-२ असा बरोबरीत होता. त्यानंतर प्रज्ञानंदनं कार्लसनला ब्लिट्झ टायब्रेकमध्ये पराभूत केले. मात्र, या विजयानंतरही कार्लसननं अधिक गुणांमुळे एफटीएक्स क्रिप्टो कप विजेतेपद पटकावलं. प्रज्ञानंद दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
अटीतटीची लढत!
प्रज्ञानंदनं कार्लसनकडून सलग तीन गेम जिंकले, त्यात टायब्रेकमधील दोन खेळांचा समावेश आहे. कार्लसन आणि प्रज्ञानंद यांच्यातील पहिले दोन सामने अनिर्णित राहिले. नॉर्वेच्या कार्लसननं तिसरा गेम जिंकला पण प्रज्ञानंदनं हार न मानता चौथा गेम जिंकून सामना टायब्रेकरवर खेचला. यानंतर टायब्रेकरमध्ये दोन्ही गेम जिंकून प्रज्ञानंदनं कार्लसनला चकित केलं.
Rameshbabu Praggnanandhaa defeats the reigning 5-time World Chess Champion, Magnus Carlsen at the FTX Crypto Cup.
(file pic) pic.twitter.com/KTFFJ0FiLv
— ANI (@ANI) August 22, 2022
हेही वाचा – घरात इलेक्ट्रिक जीप बनवणाऱ्या तरुणाची लॉटरी! आनंद महिंद्रांनी दिली ‘ही’ गोष्ट; पाहा VIDEO!
काय म्हणाला कार्लसन?
कार्लसनवर विजय मिळवूनही भारताच्या १७ वर्षीय प्रज्ञानंदनं दुसरं स्थान पटकावलं. नॉर्वेच्या कार्लसननं सर्वाधिक गुण मिळवत विजेतेपद पटकावलं. त्यानं एकूण १६ गुण मिळवले तर प्रज्ञानानंदनं १५ गुणांसह आपली मोहीम संपवली. कार्लसननं सामन्यानंतर सांगितलं ”मी दिवसभर खराब खेळलो, पण शेवटी मला तो निकाल मिळाला, ज्यासाठी मी पात्र होतो. पराभूत होणं कधीही चांगलं नसतं, परंतु ती तितकीच चांगली वेळ असते.”
काय म्हणाला प्रज्ञानंद?
प्रज्ञानंद या वर्षी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत ब संघाला कांस्यपदक जिंकण्यात मदत करण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली. कार्लसनला पराभूत केल्यानंतर तो म्हणाला, ”गेल्या काही दिवसांत मी आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो पण एकूणच दुसरं स्थान चांगलं आहे.
हेही वाचा – शेवटी विराट कोहलीनं केलं कबूल! म्हणाला, “आपल्याच माणसांनी भरलेल्या खोलीत मला…”
या वर्षी फेब्रुवारीमध्ये, प्रज्ञानंदनं जगातील नंबर एकचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनचा पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. २०१६ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी इतिहासातील सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बनलेल्या प्रज्ञानंदनं एअरथिंग्स मास्टर्स वेगवान बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनचा पराभव केला. या वर्षी मे महिन्यात देखील त्यानं चेस मास्टर्स ऑनलाइन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनला हरवलं होतं.