Commonwealth Games 2022 : सिंधूनं फक्त मेडल नाही जिंकलंय, ८ वर्षांपूर्वीचा बदलाही घेतलाय!

WhatsApp Group

Commonwealth Games 2022 : स्टार शटलर आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या भारताच्या पी.व्ही. सिंधूनं आज पुन्हा एकदा देशवासियांची मान अभिमानानं उंचावली आहे. सध्या सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये सिंधूनं या खेळाच्या इतिहासातील पहिलंवहिलं सुवर्णपद जिंकलं. तिनं आज सोमवारी महिला एकेरीच्या अंतिम फेरीत कॅनडाच्या मिशेल लीचा सलग गेममध्ये पराभव केला. सिंधूनं हा सामना २१-१५, २१-१३ असा जिंकला आणि या खेळांमधील १९वं सुवर्णपदक देशाच्या झोळीत टाकलं. फायनल जिंकण्यासाठी सिंधूला ४८ मिनिटं लागली. हा विजय आणखीनच खास आहे, कारण सिंधूच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती आणि निळ्या रंगाची पट्टी बांधल्यानं तिची चपळता थोडी कमी झाली होती. पण तिचं कौशल्य तिला सुवर्णपदक मिळवून देऊन गेलं.

८ वर्षांपूर्वीचा बदला!

या विजयासह २७ वर्षीय सिंधूनं ८ वर्षांचा कॅनडाची खेळाडू लीचा बदलाही घेतला. मिशेल ली ही तीच शटलर आहे जिनं २०१४ च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या सेमीफायनलमध्ये सिंधूचा पराभव केला होता. त्यावेळी सिंधूला कांस्यपदक मिळालं होतं. तर २०१४ मध्ये सिंधूनं कांस्यपदक जिंकलं होतं. सिंधूनं एकेरीशिवाय बर्मिंगहॅममध्ये मिश्र सांघिक रौप्यपदकही पटकावलं आहे. तिनं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकही जिंकलं आहे. सिंधूला गेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक मिळालं होतं.

सिंधूचे आई-वडीलही खेळाडू

सिंधूचा जन्म ५ जुलै १९९५ रोजी पीव्ही रमण आणि पी विजया यांच्या पोटी झाला. सिंधूचे आई-वडील दोघेही राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत. दोघेही व्हॉलीबॉलचे चांगले खेळाडू होते. त्यामुळे पीव्ही सिंधूची खेळातही आवड वाढली.

प्रशिक्षणासाठी दररोज १२० किमी प्रवास करायचा

सिंधूनं तरुण वयातच बॅडमिंटनमध्ये आपली आवड दाखवली. मात्र प्रशिक्षणासाठी जाण्यासाठी तिला खूप कष्ट करावे लागले. सिंधूचे वडील तिला रोज तीन वाजता उठवून ६० किलोमीटर दूर प्रशिक्षणासाठी घेऊन जायचे. सिंधूचे वडील तिला १२ वर्षे गोपीचंदच्या अकादमीत घेऊन जात असत.

हेही वाचा – CWG 2022 : नीरज चोप्राच्या पाकिस्तानी मित्रानं मारलं GOLD; ९० मीटर पार फेकला भाला! पाहा VIDEO

बॅडमिंटन स्पर्धेसाठी बहिणीचं लग्न चुकलं

सिंधू तिच्या बॅडमिंटन खेळासाठी इतकी समर्पित आहे की तिला तिची मोठी बहीण पी दिव्याच्या लग्नालाही मुकावं लागलं. २०१२ मध्ये दिव्याचं लग्न झालं आणि सिंधू त्यावेळी बॅडमिंटन स्पर्धा खेळत होती. त्यामुळे ती लग्नाला येऊ शकली नाही.

रिओ ऑलिम्पिकसाठी फोन सोडला

२०१६ मध्ये सिंधूनं रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलं. सिंधूचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी तीन महिने खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिचा फोन काढून घेतला होता. या तीन महिन्यांत सिंधूचं सारं लक्ष तिच्या खेळावर होते.

पोहण्याची आणि ध्यानाची आवड

फार कमी लोकांना माहीत असेल की सिंधूला जेव्हा ती मोकळी असते किंवा तिच्याकडं मोकळा वेळ असतो तेव्हा तिला पोहायला आवडतं. ती तिच्या मोकळ्या वेळेत पोहते. यासोबतच तिला योगा आणि ध्यान करण्याचीही खूप आवड आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment