Pro Kabaddi 2022 : आजपासून ‘ले पंगा’..! पहिली मॅच यू मुंबा आणि ‘या’ संघात; वाचा स्पर्धेचं वेळापत्रक!

WhatsApp Group

Pro Kabaddi League 2022 : प्रो कबड्डी लीगचा नववा हंगाम सज्ज झाला आहे. आज ७ ऑक्टोबरपासून यंदाची लीग रंगणार आहे. पहिला सामना दबंग दिल्ली विरुद्ध यू मुंबा यांच्यात होणार आहे. या मेगा टूर्नामेंटमध्ये एकूण १२ संघांमध्ये रोमांचक लढत होईल. २५ डिसेंबरला प्रो कबड्डी २०२२ चा अंतिम सामना होणार आहे. यंदाच्या हंगामाचा पहिला टप्पा बंगळुरू येथे तर दुसरा टप्पा पुण्यात होणार आहे. या मोसमाचे पहिले तीन दिवस तिहेरी हेडरसह शानदार सलामी देणार आहेत. कारण पहिल्या २ दिवसात सर्व १२ संघ प्रत्येकी एक सामना खेळतील.

कुठं पाहता येईल प्रो कबड्डी?

प्रो कबड्डी लीग लाइव्ह बघायची असेल तर तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. याशिवाय जर तुम्हाला मोबाईलवर लाइव्ह मॅच पहायच्या असतील तर डिस्ने प्लस हॉटस्टार अॅप हे एक उत्तम व्यासपीठ आहे. सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतील

हेही वाचा – दिग्गज अभिनेते अरुण बाली यांचं निधन..! ‘या’ दुर्मिळ आजाराशी देत होते झुंज

 

कोणते १२ संघ खेळणार?

  • बंगाल वॉरियर्स
  • बंगळुरू बुल्स
  • दबंग दिल्ली
  • गुजरात जायंट्स
  • हयाणा स्टीलर्स
  • जयपूर पिंक पँथर्स
  • पाटणा पायरेट्स
  • पुणेरी पलटण
  • तमिळ थलायवास
  • तेलुगु टायटन्स
  • यू मुंबई
  • यूपी योद्धा

लीग कमिशनर अनुपम गोस्वामी म्हणाले, “पीकेएल सीझन ९ हा बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद या तीन निवडक शहरांमध्ये भारतीय क्रीडा रसिकांसाठी जगातील सर्वोत्तम कबड्डीची हाय-व्होल्टेज अॅक्शन आणण्यासाठी सज्ज आहे. मागील प्रत्येक हंगामाप्रमाणे, ही हंगामही कबड्डी चाहत्यांसाठी भारतात कबड्डीची वाढ सुरू ठेवण्यासाठी एक मजबूत बेंचमार्क सेट करेल.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment