Prakash Padukone on Lakshya Sen : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेन देशासाठी पदक जिंकेल अशी अपेक्षा होती. त्याने भारतासाठी पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारून इतिहास रचला. असे करणारा तो पहिला भारतीय ठरला. 4 ऑगस्ट रोजी सेमीफायनलमध्ये लक्ष्य सेनचा डेन्मार्कच्या एक्सेलसेन व्हिक्टरने पराभव केला. एका दिवसानंतर 5 ऑगस्ट रोजी कांस्यपदकाच्या लढतीत मलेशियाच्या ली जी जियाने 13-21, 21-16 आणि 21-11 ने पराभूत केले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रशिक्षक म्हणून बॅडमिंटन संघाशी निगडीत असलेले अनुभवी प्रकाश पादुकोण यांनी निशाणा साधला आणि सांगितले की, चौथा क्रमांक नको होता, सोमवारी लक्ष्य सेनला जिंकण्याची आशा होती मलेशियाच्या ली जी जियाला हरवून भारताचे बॅडमिंटनमध्ये पदक संपुष्टात आले. या सामन्यातील पराभवानंतर तो चौथ्या स्थानावर राहिला. लक्ष्याच्या पराभवावर प्रशिक्षक प्रकाश पदुकोण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
"It's high time players take responsibility. The Govt & Federations have done whatever they can. Players are not working hard enough"
— BALA (@erbmjha) August 5, 2024
Prakash Padukone woke up and chose violence 🔥 pic.twitter.com/FhbxK3nxK9
पदुकोण स्पष्टपणे म्हणाले, “लक्ष्य सेन ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर आल्याने मी आणि विमल अजिबात खूश नाही. तो देशासाठी नक्कीच पदक जिंकू शकला असता. काही लोक नक्कीच म्हणतील की लक्ष्य हा पुढचा सुपरस्टार खेळाडू होणार आहे असे एक्सलसेनने सांगितले. या गोष्टींनी काही फरक पडत नाही. खेळाडूंना सर्वोत्तम पायाभूत सुविधा मिळाल्या आहेत आणि खेळाडूंनी जबाबदारी घेण्याची हीच वेळ आहे. तुम्ही फेडरेशन किंवा सरकारला जबाबदार धरू शकत नाही.”
हेही वाचा – रिटायरमेंटनंतर वापसी…! दिनेश कार्तिक आता ‘या’ संघासाठी खेळणार
“लक्ष्याला पदक जिंकण्याची संधी होती. बघा, तो ग्रुप मॅचमध्येच जोनाथन क्रिस्टीकडून हरला असता तर तो चर्चेचा विषय ठरला असता. इथपर्यंत येऊन जिंकल्यानंतर, जेव्हा तुम्हाला पदक जिंकण्याची संधी होती, तेव्हा तुमच्याकडे सामन्यात लीड होती पण हरलात.”
व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!