अहमदाबादमध्ये आयसीसी वर्ल्डकप फायनलमधील पराभवानंतर भारतीय संघ कमालीचा निराश झाला. या पराभवानंतर खेळाडूंना आधार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रेसिंग रूममध्ये (PM Modi In Indian Team Dressing Room) भेट दिली. मोदींनी खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांना प्रोत्साहन दिले. पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये खूपच निराश दिसत होते.
खेळाडूंशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, देशवासी तुम्हाला पाहत आहेत, हिंमत ठेवा. एकमेकांना प्रोत्साहन देत राहा. मोदींसोबत गृहमंत्री अमित शाहही दिसले. मोदींनी सर्व खेळाडूंना दिल्लीत येण्याचे निमंत्रणही दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भारतीय खेळाडूंच्या संभाषणाचा व्हिडिओ पीएमओने जारी केला आहे. सर्वप्रथम भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्या खांद्यावर हात ठेवून पंतप्रधान मोदी बोलताना दिसले. ते म्हणाले, ”तुम्ही लोक 10-10 गेम जिंकून इथे आला आहात. हे होत राहते.”
हेही वाचा – भारतीय वायुसेनेत भरती, दीड लाखांहून अधिक पगार! असा भरा अर्ज
निराश झालेल्या रोहितला मोदी म्हणाले, ”हसो भाई, देश तुम्हाला पाहत आहे, हे सर्व घडते.” रोहित शर्मा आणि विराट कोहलीने पीएम मोदींचे आभार मानले. विराट आणि रोहितची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की तुम्ही लोकांनी खूप मेहनत केली आहे.
राहुल द्रविडची भेट घेतल्यानंतर मोदींनी जडेजाला ‘क्या बाबू’ असे संबोधले आणि गुजरातीमध्ये संवाद साधला. त्यानंतर मोदींनी मोहम्मद शमीचीही पाठ थोपटली. ऑस्ट्रेलियन संघाने वर्ल्डकपमध्ये 8व्यांदा अंतिम सामना खेळला. 1975 मध्ये वेस्ट इंडिज आणि 1996 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 1987, 1999, 2003, 2007, 2015 आणि 2023 मध्ये सर्वाधिक 6 वेळा त्यांनी विजेतेपद पटकावले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!