VIDEO : तब्बल 454 दिवसांनंतर ऋषभ पंतचे मैदानात कमबॅक…! पाहा इमोशनल मुमेंट

WhatsApp Group

Rishabh Pant Comeback In IPL 2024 : युवा यष्टीरक्षक फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतसाठी आजचा दिवस मोठा आहे. डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर परतत आहे. गेल्या 15 महिन्यांपासून म्हणजेच 454 दिवस तो क्रिकेटपासून दूर होता. आयपीएलमध्ये शनिवारी पंजाब किंग्जविरुद्ध नाणेफेकसाठी मैदानात आलेल्या पंतने सांगितले, की हा त्याच्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. पण त्याला जास्त विचार न करता या क्षणांचा आनंद घ्यायचा आहे.

आपल्या कमबॅक मॅचमध्ये पंतने 13 चेंडूत 18 धावा केल्या. या खेळीत त्याला एक जीवदानही मिळाले. पंतने 2 चौकार लगावले. या सामन्यासह दिल्ली आणि पंजाबचे संघ आयपीएलच्या 17 व्या हंगामात आपापल्या मोहिमेला सुरुवात करत आहेत. पंजाबमधील मुल्लानपूरच्या नव्या स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – SBI : स्टेट बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी बातमी..! उद्या बंद राहणार ‘या’ सेवा, वाचा

दोन्ही संघांची Playing 11

पंजाब किंग्ज – शिखर धवन (कप्तान), जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग.

दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (कप्तान/विकेटकीपर), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment