“पाकिस्तानचं क्रिकेट भारतापेक्षा चांगलंय…”, वर्ल्डकपपूर्वी जावेद मियांदादनं ओकलं विष!

WhatsApp Group

Javed Miandad On India : आशिया चषक 2023 स्पर्धेचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता सर्वांना आशा आहे की लवकरच आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) चे वेळापत्रक देखील जाहीर केले जाईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपल्या संघाला भारतात होणाऱ्या आगामी मेगा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परवानगी दिलेली नाही. या कारणास्तव, आयसीसी अद्याप अधिकृतपणे वेळापत्रक जाहीर करू शकले नाही. दरम्यान, पाकिस्तानचे माजी खेळाडू जावेद मियांदाद यांनी पुन्हा एकदा भारताबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे पाठवला होता. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये 15 ऑक्टोबरला होणार होता. या सामन्याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा सामना इतर ठिकाणीही खेळवण्याची चर्चा केली आहे.

पाकिस्तानी मीडियाशी बोलताना जावेद मियांदाद म्हणाले की, क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये. पण भारत पाकिस्तानात यायला तयार नाही. अशा परिस्थितीत पाकिस्ताननेही भारतात खेळायला जाऊ नये. भारत इथे आला नाही तर नरकात जाऊदे, जरी आला नाही तरी आम्ही सर्वोत्तम क्रिकेटपटू तयार करत आहोत. आम्हाला तुमच्या दिशेने हात पुढे करायचा आहे, तुम्हीही या आणि हात पुढे करा, आमच्याशी बोला जेणेकरून दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील आणि खेळाला चालना मिळेल.

हेही वाचा – फक्त 3 महिने काम करून करोडपती होतात ‘हे’ लोक, रोजची कमाई 1.25 लाख!

मियांदाद पुढे म्हणाले की, या मुद्द्यावर मला स्पष्टपणे सांगायचे आहे की, जर भारत इथे खेळायला येत नसेल तर आपणही तिथे जाऊ नये. जागतिक क्रिकेटमध्ये सतत स्वत:ची ओळख निर्माण करणारा सर्वोत्तम खेळाडूही आमच्याकडे आहे.

भारतामध्ये 2023 मध्ये होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकात सहभागी होण्याबाबत, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या त्यांच्या वक्तव्यात म्हटले होते की, त्यांना याबाबत अद्याप पाकिस्तान सरकारकडून परवानगी मिळालेली नाही. अशा परिस्थितीत त्यांचा निर्णय आल्यानंतरच याबाबतची परिस्थिती स्पष्टपणे सांगता येईल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment