पाकिस्तानचा मोठा क्रिकेटर होणार निवृत्त! भारताविरुद्धच्या पराभवानंतर धक्कादायक खुलासा

WhatsApp Group

IND vs PAK :  भारताविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी खेळाडू आणि चाहत्यांमध्ये प्रचंड संताप आहे. दरम्यान, एक खूप मोठी बातमी समोर आली आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि निवडकर्ता रशीद लतीफ यांच्या हवाल्याने एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. दुबईतील त्यांच्या संघाच्या पराभवानंतर, पाकिस्तानचा एक मोठा खेळाडू लवकरच निवृत्त होणार असल्याचे उघड झाले आहे.  

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे विश्लेषण करण्यासाठी रशीद लतीफ पाकिस्तानी टीव्ही शो ‘हंसना मन है’ मध्ये आले होते. यावेळी त्याच्यासोबत मोहम्मद आमिर आणि अहमद शहजाद देखील उपस्थित होते. त्यानंतर शोचा होस्ट तबीश हाश्मीने सांगितले की, रशीद लतीफकडे एका खूप मोठ्या क्रिकेटपटूच्या निवृत्तीची बातमी आहे. आता हा खेळाडू कोण आहे हे अंदाज लावणे कठीण आहे. याबद्दलची माहिती नंतर कळेल, पण या बातमीवरून असे दिसते की पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा काही उलथापालथ होणार आहे.

पाकिस्तानच्या पराभवामुळे रशीद लतीफ खूप दुखावलेले दिसत होते. ते म्हणाले, की गेल्या १५ वर्षांत त्यांना फक्त दोनदाच आनंद मिळाला आहे. एकदा २००९ मध्ये जेव्हा त्यांनी टी-२० विश्वचषक जिंकला आणि दुसऱ्यांदा २०१७ मध्ये जेव्हा त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. रशीद लतीफ यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, कोणतीही निवड गुणवत्तेवर आधारित नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

लतीफ म्हणाले, ‘जेव्हा तुमचा अध्यक्ष गुणवत्तेवर निवडला जातो तेव्हा गुणवत्ता येते.जेव्हा तेच गुणवत्तेच्या आधारे निवडले जात नाहीत, तेव्हा तुम्हाला समान परिणाम दिसतील. पीसीबी अध्यक्षांसोबत काम करणाऱ्यांचा क्रिकेटशी काहीही संबंध नाही. तुम्ही स्टेडियम बांधू शकता, पण तुम्हाला खेळाबद्दल काहीही माहिती नाही. गुणवत्तेची जाणीव वरून होणे महत्त्वाचे आहे.’

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment