Pakistan’s Arshad Nadeem Story : भारताच्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 86.59 मीटर लांब भालाफेक करून फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर फायनलमध्ये सर्वांच्या नजरा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रावर होत्या. पण अर्शद नदीमने सर्वांना थक्क केले. पहिला फाऊल झाल्यानंतर अर्शदने 92.97 मीटर लांब भाला फेकत नवीन रेकॉर्ड रचला. त्याने 16 वर्षांपूर्वीचा ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडला. यापूर्वी 2008 मध्ये नॉर्वेच्या अँड्रियास थॉर्किलडसेनने 90.57 मीटर लांब भाला फेकला होता.
पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. इतर खेळांची अवस्था तुम्ही त्यांच्या खेळाडूंच्या आकडेवारीमधून समजू शकता. त्यामुळे ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्याची अर्शदची कहाणी प्रेरणादायी आहे. अर्शदचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे वडील मजूर आणि आई गृहिणी होती. जेव्हा गावातील लोक पैसे द्यायचे तेव्हा अर्शद शहरात जाऊन प्रशिक्षण घेऊ शकला. शिक्षणाची ऐपत नसल्याने अर्शदला पुढे शिकता आले नाही.
92.97m, a new olympic record. Arshad Nadeem. Almost there 🥇 pic.twitter.com/pymwAmxlIH
— PSL Memes (@PSLMemesWalay) August 8, 2024
अर्शद हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील खानवाल भागात राहणारा आहे. एका मुलाखतीत अर्शदचे वडील मोहम्मद अशरफ म्हणाले, “अर्शद या पदावर कसा पोहोचला याची लोकांना कल्पना नाही. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात गावातील लोक आणि नातेवाईक पैसे दान करायचे जेणेकरून तो वेगळ्या शहरात जाऊन ट्रेनिंग घेऊ शकेल.”
ARSHAD NADEEM'S THROW OF 92.97M IS A RECORD IN OLYMPICS 🇵🇰❤️❤️❤️#Paris2024 #OlympicGames pic.twitter.com/1hnkT4qXCR
— Farid Khan (@_FaridKhan) August 8, 2024
हेही वाचा – वायुसेनेला मिळणार टाटांची ताकद! 2026 पर्यंत बनवणार आकाशातील ‘राजा’ विमान
काही महिन्यांपूर्वी नदीमने आपल्या प्रशिक्षणासाठी जुना भाला बदलून नवीन भाला देण्याची मागणी केली होती. या मुद्द्यावर नीरज चोप्रानेही नदीमचे समर्थन केले होते. नदीमने आपल्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन भरपूर यश संपादन केले आहे. यावेळी नदीम पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकेल असा विश्वास त्याच्या देशवासीयांना, कुटुंबातील सदस्यांना आणि चाहत्यांना होता, जो त्याने सार्थ ठरवला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नदीमने पाचवे स्थान पटकावले होते.
पाकिस्तानने 2024 च्या ऑलिम्पिकसाठी 7 खेळाडू पाठवले होते, त्यापैकी 6 अंतिम फेरीत पोहोचू शकले नाहीत. आता 27 वर्षीय नदीम पाकिस्तानची पदकाची शेवटची आशा होता. अर्शदने गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक आणि 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!