IPL स्पॉट फिक्सिंग, मुंबई मॉडेल, कपडे विक्री आणि पाकिस्तानी अंपायर असद रौफ!

WhatsApp Group

पाकिस्तानातील लाहोर येथे जन्मलेले माजी पंच असद रौफ यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी २०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली. याशिवाय त्यांनी आयपीएलसारख्या मोठ्या टूर्नामेंटमध्येही कामगिरी बजावली होती. मात्र, २०१३ मध्ये बुकींच्या संपर्कात आल्यामुळं त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.

रौफ यांची कारकीर्द

ICC एलिट पॅनेलचे माजी पंच, असद रौफ यांनी ६४ कसोटी (४९ मैदानी पंच म्हणून आणि १५ टीव्ही पंच म्हणून), १३९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि २८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये काम केले आहे. रौफ हे २००० च्या दशकाच्या मध्यात पाकिस्तानच्या उत्कृष्ट पंचांपैकी एक होते, त्यांना २००६ मध्ये ICC च्या एलिट पॅनेलमध्ये स्थान मिळालं होतं. २००४ पासून ते ODI एलिट पॅनेलचे भाग होते, २००० मध्ये त्यांनी पहिल्यांदा पंचगिरी केली होती.

हेही वाचा – Foxconn Vedanta Plant : महाराष्ट्रातून कोट्यवधींचा प्रकल्पही गेला आणि लाखो नोकऱ्याही गेल्या!

असद रौफ अंपायरिंग सर्किटमधील एक लोकप्रिय व्यक्ती होती, ज्यानं अलीम दार यांच्यासोबत, पाकिस्तानी पंचांची प्रतिष्ठा सुधारण्यात योगदान दिलं होतं, परंतु २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केल्यावर त्यांची कारकीर्द अचानक थांबली. त्या घटनेच्या तपासात ‘वॉन्टेड आरोपी’ म्हणून रौफ यांचं नाव देण्यात आलं.

कपडे आणि बूट विकत होते रौफ!

या घटनेनंतर बीसीसीआयनं त्याच्यावर बंदी घातली आणि आयसीसीनं त्यांना एलिट पॅनलमधून वगळले. यानंतर ते अंपायरिंग करताना दिसले नाही. काही काळापूर्वी ते पाकिस्तानमधील एका दुकानात कपडे आणि बूट विकताना दिसले. त्यांनी २-०१३ पासून क्रिकेटपासून दूर राहून क्रिकेट पाहणं बंद केले होते. ”जे काही काम मी सोडून देतो ते मी पूर्णपणे सोडून देतो”, असं ते म्हणाले होते.

गंभीर आरोप..

मैदानाबाहेरही रौफ चर्चेत होते. ऑगस्ट २०१२ मध्ये रौफ यांच्यावर मुंबईस्थित मॉडेल लीना कपूरनं लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यांचे सोशल मीडियावर अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत. लग्नाच्या बहाण्यानं रौफ यांनी तिच्याशी अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला होता. लीनानं रौफ याच्या जवळचे वास्तव जगाला दाखवण्यासाठी सोशल फोटो देखील पोस्ट केले होते.

हेही वाचा – “जर त्यानं मला…”, CSK च्या खेळाडूचा महेंद्रसिंह धोनीवर खळबळजनक आरोप? वाचा!

असद रौफ यांच्या आकस्मिक निधनानं सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करत आहेत. इतकंच नाही तर रौफ यांचे चाहतेही त्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करत आहेत आणि त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करत आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment