CWG 2022 : नीरज चोप्राच्या पाकिस्तानी मित्रानं मारलं GOLD; ९० मीटर पार फेकला भाला! पाहा VIDEO

WhatsApp Group

CWG 2022 : पाकिस्तानचा स्टार भालाफेकपटू अर्शद नदीमने कॉमनवेल्थ गेम्स २०२२ (Commonwealth Games 2022) मध्ये आपल्या थ्रोनं जगभरात धमाका उडवून दिला आहे. नीरज चोप्राच्या अनुपस्थितीत पाकिस्तानच्या नदीमनं सुवर्णपदक जिंकलं. त्यानं ९०.१८ मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावल. हा त्याचा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो ठरला. नीरजला अद्याप ९० चा टप्पा ओलांडता आलेला नाही आणि नदीमनं कॉमनवेल्थमध्ये आपल्या ३१व्या थ्रोमध्ये हा ही कामगिरी केली.

अर्शद नदीमनं रचला विक्रम

अर्शद नदीमनं ४ वर्षांपूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राला मागं टाकून रौप्यपदक जिंकलं होतं. पुरुषांच्या भालाफेकमध्ये ९० मीटरचा टप्पा ओलांडणारा तो आता तैवानच्या चाओ-सन चेननंतर दुसरा आशियाई भालाफेकपटू ठरला आहे. अर्शदचा ९०.१८ थ्रो हाही कॉमनवेल्थमध्ये नवा विक्रम ठरला. नीरज चोप्रा अजून ९० मीटरचा अडथळा पार करू शकलेला नाही.

दरम्यान, भारताचे खेळाडू डीपी मनू आणि रोहित यादव यांनी १२ जणांच्या अंतिम फेरीत ८२.२८ मीटर आणि ८२.२२ मीटर थ्रो करून पाचवे आणि सहावे स्थान मिळवलं. अर्शद प्रशिक्षक टेरेसियस लीबेनबर्ग यांच्यासोबत दक्षिण आफ्रिकेत प्रशिक्षण घेत होता, त्यानं पाकिस्तानला त्यांच्या दुसऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिलं.

नीरज-अर्शद मित्र

अर्शद आणि टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्यात अनेकदा रोमांचक लढत होते. दोघेही चांगले मित्र आहेत. अर्शदही अनेकदा स्पर्धेत नीरजचा भाला वापरतो. तो काही काळापासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे, तो टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ८४.६२ मीटर थ्रो करून पाचव्या स्थानावर राहिला होता. यानंतर, त्यानं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपली कामगिरी सुधारली आणि ८६.१६ मीटर थ्रो करून पाचवं स्थान मिळवलं. यानंतरही अर्शदची सुधारणा सुरूच राहिली. कॉमनवेल्थमध्ये त्यानं विक्रमी थ्रो केला आहे. नीरजनं काही काळापूर्वी डायमंड लीगमध्ये ८९.९४ मीटर फेक केले होते.

अर्शद नदीम हा नीरज चोप्राचा मोठा चाहता आहे. दोघेही अनेकदा एकमेकांना प्रोत्साहन देतात. खरं तर, नीरजला वर्ल्ड चॅम्पियनशिपदरम्यान दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला ही कॉमनवेल्थ स्पर्धा खेळता आली नाही. यावर अर्शदनं नीरजविरुद्धच्या स्पर्धेची कमतरता जाणवेल असं म्हटलं होतं. अर्शद नीरजला आपला भाऊ मानतो.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment