Pakistan Cricketer Died During Live Match : पाकिस्तानमध्ये खेळल्या जात असलेल्या क्रिकेट मॅचदरम्यान असा अपघात घडला की सगळेच खेळाडू हादरले. क्षेत्ररक्षण करत असलेला उस्मान शिनवारी नावाचा खेळाडू अचानक खाली कोसळला. बाकीच्या खेळाडूंनी हे पाहताच सर्वजण त्याच्या दिशेने धावले आणि त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बेशुद्धच राहिला. यानंतर उस्मानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या खेळाडूचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. या क्रिकेटपटूच्या मृत्यूने मैदानावर उपस्थित सर्व खेळाडू हादरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान कॉर्पोरेट लीग अंतर्गत लाहोरमधील प्रसिद्ध ज्युबली क्रिकेट मैदानावर रविवारी (२५ सप्टेंबर) हा सामना खेळला जात होता. या सामन्यात बर्जर पेंट्स आणि फ्रिजलँड हे संघ आमनेसामने होते. ही घटना घडली तेव्हा बर्जर पेंट्सची बॅटिंग सुरू होती. त्यानंतर मैदानावर असलेला फ्रिजलँडचा क्षेत्ररक्षक उस्मान शिनवारी हा जमिनीवर कोसळला. ही घटना पाहून सर्व खेळाडू सर्वांना सोडून त्याच्या दिशेने धावले. खेळाडू त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. पण, यात ते अपयशी ठरतात.
हेही वाचा – IND Vs AUS 3rd T20 : कार्तिकचा हात लागून बेल पडली, तरीही मॅक्सवेल रनआऊट..! वाचा नियम
During a match between Burger Paints and Friesland , Usman Shinwari fell down due to heart attack and was brought to the hospital immediately where he couldn't survive. RIP pic.twitter.com/YKnnawSiTq
— Tahir Jamil Khan (@TahirJamilKhan3) September 25, 2022
पसरली ‘अशी’ अफवा!
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आणि अशी अफवा पसरली की हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला क्रिकेटपटू उस्मान शिनवारी होता, जो पाकिस्तानसाठी कसोटी, एकदिवसीय खेळला होता. मात्र, लवकरच पाकिस्तानी पत्रकारांनी ही अफवा पसरवण्यापासून रोखले आणि योग्य माहिती दिली आणि सांगितलं की, ज्या खेळाडूला जीव गमवावा लागला आहे तो कॉर्पोरेट क्रिकेट खेळणारा उस्मान आहे.