PAK vs SL Asia Cup 2022 Final : टीम इंडिया करतेय पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना? कारण…

WhatsApp Group

Asia Cup 2022 Final : आशिया चषक २०२२च्या अंतिम फेरीत आज म्हणजेच आज रविवारी पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) क्रिकेट संघ आमनेसामने आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विजेतेपदाचा सामना खेळला जात आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवायचं आहे तर दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघ सहाव्यांदा आशियाचा बादशाह बनू पाहत आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

या स्पर्धेत एकूण ६ संघ मुख्य फेरीत होते. प्रत्येक गटातील टॉप-२ संघांना सुपर-४ मध्ये स्थान मिळाले. सुपर-४ मधील टॉप-२ संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. आशिया चषकाचा हा १५वा मोसम आहे. टीम इंडियानं सात वेळा विजेतेपद पटकावले आहे. मात्र, चालू हंगामात भारताला सुपर-४ च्या पुढं प्रगती करता आली नाही. दुसरीकडे श्रीलंकेनं पाच तर पाकिस्ताननं दोन वेळा विजेतेपद पटकावलं. पाकिस्ताननं शेवटचे विजेतेपद दहा वर्षांपूर्वी २०१२ मध्ये जिंकले होते.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार BA ची परीक्षा..! हॉल तिकीटचा PHOTO व्हायरल

टीम इंडियाचा रेकॉर्ड धोक्यात

स्पर्धेचा इतिहास पाहता भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी ३९-३९ सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत श्रीलंकेचा संघ आज विजेतेपदाचा सामना जिंकला तर तो आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणारा संघ बनेल. पाकिस्तानचा संघ ३१ सामने जिंकून तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकानं आशिया कपमध्ये आतापर्यंत ५९ सामने खेळले आहेत. पाकिस्ताननं आतापर्यंत ५४ सामने खेळले आहेत.

दोन्ही संघांची Playing 11

  • पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), नसीम शाह, मोहम्मद हसनैन.
  • श्रीलंका : दासून शनाका (कर्णधार), पथुम निसांका, दनुष्का गुणथिलका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, वनिंदू हसरंगा, महेश टेकश्ना, चमिका करुणारत्ने, प्रमोद मदुसन, दिलशान मदुशंका.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment