Rachin Ravindra Breaks Sachin Tendulkar’s Record : न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रवींद्रने विश्वचषक 2023 च्या 35व्या सामन्यात (PAK vs NZ World Cup 2023) पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून इतिहास रचला आहे. न्यूझीलंडकडून विश्वचषकामध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा तो फलंदाज ठरला आहे. त्याच वेळी, त्याच्या नावावर आता न्यूझीलंडकडून एकाच विश्वचषकात सर्वाधिक 3 शतके आहेत. रचिन रवींद्रने 94 चेंडूत 15 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकारासह 108 धावांची खेळी केल आणि घरच्या मैदानावर (चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू) पाकिस्तानी गोलंदाजांचा धुव्वा उडवला. यापूर्वी त्याने याच स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध शतके ठोकली होती. रचिन आणि विल्यमसनच्या (95 धावा) योगदानामुळे न्यूझीलंडने पाकिस्तानला 402 धावांचे आव्हान दिले आहे.
रचिन रवींद्र विश्वचषकाच्या इतिहासात 3 शतके करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. वयाच्या 23व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली. या बाबतीत त्याने या वयात विश्वचषकात 2 शतके झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
रचिनला पाकिस्तानविरुद्ध डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत रचिनने नंबर-3 चे स्थान चांगल्या प्रकारे हाताळले होते, परंतु आज कर्णधार परतल्यावर त्याने डावाची सुरुवात करतानाही संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने पहिल्या विकेटसाठी कॉन्वेसोबत 68 आणि दुसऱ्या विकेटसाठी विल्यमसनसोबत 180 धावांची भागीदारी केली.
हेही वाचा – मेडिकल मास्क किती वेळ लावून ठेवावा? एक तास, दोन तास?
रचिन रवींद्र या विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो सध्या विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. क्विंटन डी कॉकनंतर त्यानेही या स्पर्धेत 500 धावांचा टप्पा पार केला.
पाकिस्तानचा धुव्वा
सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे आणि रचिन रवींद्र यांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. हसन अलीने कॉन्वेला (35) बाद करत ही भागीदारी मोडली. त्यानंतर कप्तान केन विल्यमसनह रचिनने संघाला अडीचशेच्या जवळ पोहोचवले. विल्यमसनचे शतक हुकले. इफ्तिकार अहमदने त्याला वैयक्तिक 95 धावांवर बाद केले. विल्यमसनने 10 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी केली. 36व्या षटकात रचिन बाद झाला. त्याने 15 चौकार आणि 1 षटकारासह 108 धावा केल्या. या दोघांनंतर मार्क चॅपमन (39), ग्लेन फिलिप्स (41) यांनी महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. मिचेल सँटनर 26 धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडने 50 षटकात 6 बाद 401 धावा उभ्या केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. शाहिन आफ्रिदी (10 षटकात 90 धावा), हारिस रौफ (10 षटकात 85 धावा आणि 1 विकेट) महागडे ठरले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!