400 रन्स मारूनही न्यूझीलंड हरली, फखर झमानचा वन मॅन शो!

WhatsApp Group

PAK vs NZ World Cup 2023 In Marathi : फखर झमानचे वादळी शतक आणि पावसाने केलेल्या कृपेमुळे पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध अशक्यप्राय विजय मिळवला आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानने हा सामना 21 धावांनी जिंकला आणि उपांत्य फेरीतील आव्हान जिवंत ठेवले. पावसाचा विचार करता पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. चिन्नास्वामीचे छोटे मैदान आणि सपाट खेळपट्टीचा फायदा उचलत न्यूझीलंडने 50 षटकात 401 धावा केल्या. युवा रचिन रवींद्रने स्पर्धेतील तिसरे शतक झळकावले. कमबॅक केलेल्या कप्तान केन विल्यमसननेही 95 धावांची सुंदर खेळी केली.

पाकिस्तानचा धुव्वा

सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे आणि रचिन रवींद्र यांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. हसन अलीने कॉन्वेला (35) बाद करत ही भागीदारी मोडली. त्यानंतर कप्तान केन विल्यमसनह रचिनने संघाला अडीचशेच्या जवळ पोहोचवले. विल्यमसनचे शतक हुकले. इफ्तिकार अहमदने त्याला वैयक्तिक 95 धावांवर बाद केले. विल्यमसनने 10 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी केली. 36व्या षटकात रचिन बाद झाला. त्याने 15 चौकार आणि 1 षटकारासह 108 धावा केल्या.

या दोघांनंतर मार्क चॅपमन (39), ग्लेन फिलिप्स (41) यांनी महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. मिचेल सँटनर 26 धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडने 50 षटकात 6 बाद 401 धावा उभ्या केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. शाहिन आफ्रिदी (10 षटकात 90 धावा), हारिस रौफ (10 षटकात 85 धावा आणि 1 विकेट) महागडे ठरले.

हेही वाचा – मुकेश अंबानींकडून 400 कोटी मागणारा मुंबई पोलिसांच्या तावडीत

फखर झमानची आतषबाजी

प्रत्युत्तरात न्यूझीलंडने अब्दुल्ला शफीकच्या रुपात पाकिस्तानला पहिला धक्का लवकर दिला. पण त्यानंतर नेट रनरेटचा विचार करता सलामीवीर फखर झमानने आतषबाजी फटके खेळले. त्याला कप्तान बाबर आझमची साथ लाभली. या दोघांमध्ये 154 धावांची भागीदारी झाली असताना पावसाचे आगमन झाले. ओव्हर्स कमी झाल्यामुळे पाकिस्तानला 41 ओव्हर्समध्ये 342 धावांचे आव्हान मिळाले. फखर-बाबरने कोणताही दबाव न घेता मुक्त फलंदाजी केली आणि संघाला 25.3 षटकात 1 बाद 200 धावांकडे नेले.

यानंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले, तेव्हा पाकिस्तान डकवर्थ-लुईसच्या निमयानुसार 21 धावांची पुढे असल्याचे समोर आले. फखरने 81 चेंडूंत 8 चौकार आणि 11 षटकारांसह नाबाद 126 तर बाबरने 6 चौकार आणि 2 षटकारांसह 66 धावांची खेळी केली. पावसाचा जोर वाढल्यामुळे सामना होणार नाही, असे अंपायर्सनी जाहीर केले आणि पाकिस्तानने या सामन्याचे गुण आपल्या झोळीत टाकले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment