PAK vs ENG World Cup 2023 : पाकिस्तानचा वर्ल्डकप 2023 मधील प्रवास पराभवाने संपुष्टात आला आहे. स्पर्धेतील 44व्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 93 धावांनी पराभव केला. पाकिस्तानचा 9 सामन्यांमधला हा पाचवा पराभव आहे. वर्ल्डकपच्या 48 वर्षांच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर पहिल्यांदाच पाकिस्तानने एका मोसमात 5 सामने गमावले. अशाप्रकारे कर्णधार बाबर आझमने लज्जास्पद विक्रम केला आहे. याआधी 1983 आणि 1999 मध्ये पाकिस्तानने सर्वाधिक 4-4 सामने गमावले होते.
बेन स्टोक्स, जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने प्रथम बॅटिंग करताना 9 गडी गमावून 337 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 43.3 षटकांत 244 धावा करून सर्वबाद झाला. हारिस रौफ आणि मोहम्मद वसीम यांनी शेवटच्या षटकांमध्ये चौकार आणि षटकार मारले. दोघांनी 10व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. संघातर्फे सलमान आघाने सर्वाधिक 51 धावा केल्या. या स्पर्धेत इंग्लंडची कामगिरीही काही विशेष नव्हती. त्यांना 9 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले.
हेही वाचा – काय खरं नव्हतं, 4 वर्ष उशीर झाला, पण धनंजय मुंडेंनी ‘त्या’ 19 तरुणांचं करियर वाचवलं!
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला पाकिस्तान संघ सुरुवातीपासूनच गडबडला. पहिल्याच षटकात सलामीवीर फलंदाज अब्दुल्ला शफीक खाते न उघडता डेव्हिड विलीच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर विलीने फखर झमानलाही एका धावेवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 10 धावांत 2 विकेट पडल्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र बाबर 38 धावा करून तर रिझवान 36 धावा करून बाद झाला. यानंतर संघाची कोंडी झाली.
सौद शकीलने 29 आणि इफ्तिखार अहमदने 3 धावा केल्या. सलमान आगा एका टोकाकडून खंबीरपणे उभा राहिला तर दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत राहिल्या. शादाब खानला केवळ 4 धावा करता आल्या. सलमान आगा 51 धावा करून डेव्हिड विलीचा तिसरा बळी ठरला. विश्वचषकातील सलमानचे हे पहिले अर्धशतक आहे. शाहीन आफ्रिदीने 25 आणि हरिस रौफने 35 धावांचे योगदान दिले. मोहम्मद वसीम 16 धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून लेगस्पिनर आदिल रशीद आणि ऑफस्पिनर मोईन अलीनेही प्रत्येकी 2 बळी घेतले. वेगवान गोलंदाज ऍटकिन्सननेही 2 बळी घेतले.
रौफच्या नावावर लज्जास्पद विक्रम
त्याआधी इंग्लंडकडून स्टोक्स (84), जॉनी बेअरस्टो (59) आणि जो रूट (60 धावा) यांनी अर्धशतके झळकावली. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हारिस रौफने 64 धावांत 3 तर शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद वसीमने प्रत्येकी 2 बळी घेतले. हारिस रौफ वर्ल्डकपच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला. या स्पर्धेत त्याने 533 धावा दिल्या.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!