NZ vs SA : क्विंटन डी कॉकने रचला इतिहास, रोहित शर्माचा विक्रम धोक्यात!

WhatsApp Group

Quinton De Kock 4th Century In World Cup 2023 : वर्ल्डकप 2023 चा 32 वा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड (NZ vs SA) यांच्यात पुण्यात खेळला जात आहे. आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने या सामन्यात शानदार फलंदाजी करत इतिहास रचला आहे. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडसमोर 357 धावांचा डोंगर उभा केला आहे. सलामीवीर क्विंटन डी कॉकने न्यूझीलंडविरुद्ध या वर्ल्डकपचे चौथे शतक झळकावले. सोबत विश्वचषकाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा तो त्याच्या संघाचा पहिला फलंदाज ठरला आहे.

डी कॉकपूर्वी माजी अष्टपैलू जॅक कॅलिसच्या नावावर या विशेष कामगिरीची नोंद आहे. विश्वचषक हंगामात खेळताना त्याने आपल्या संघासाठी 485 धावा केल्या होत्या. मात्र, डी कॉकने आता त्याला मागे सोडले आहे. यासह डी कॉकने एकाच विश्वचषकात चार शतके झळकावणाऱ्या श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराची बरोबरी केली आहे. ज्याच्या नावावर 4 शतके आहेत. आता डी कॉकची नजर भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या विक्रमावर आहे, ज्याच्या नावावर पाच शतके आहेत. आजच्या सामन्यात डी कॉकने 10 चौकार आणि 5 षटकारांसह 114 धावा केल्या.

हेही वाचा – “मराठा आरक्षणाला एकमुखी पाठिंबा”, सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची माहिती!

दक्षिण आफ्रिकेचा डाव

कप्तान टेम्बा बावुमा आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या गड्यासाठी 38 धावा फलकावर लावल्या. ट्रेंट बोल्टने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. बावुमाने 24 धावा केल्या. यानंतर डी कॉक आणि रासी वॅन डर डुसेन यांवी द्विशतकी भागीदारी रचली. डी कॉकने 10 चौकार आणि 5 षटकारांसह 114 धावांची खेळी केली. टीम साऊदीने त्याला झेलबाद केले. डुसेन आणि डेव्हिड मिलरने संघाला तीनशेपार पोहोचवले. डुसेनने 9 चौकार आणि 5 षटकारांसह 133 धावा केल्या. वेगवान गोलंदाज टीम साऊदीने त्याला बाद केले. त्यानंतर मिलरने आक्रमक फटकेबाजी करत 30 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह 53 धावा फटकावल्या. क्लासेन 15 आणि मार्कराम 6 धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेने 50 षटकात 4 बाद 357 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके :

  • 27- हाशिम आमला
  • 25- एबी डिव्हिलियर्स
  • 21 – क्विंटन डी कॉक*
  • 21 – हर्शेल गिब्स
  • 17 – जॅक कॅलिस

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment