NZ vs IND 2nd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना माउंट मौनगानुई येथे खेळला गेला. सूर्यकुमार यादवचे शानदार शतक आणि दीपक हुडाच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवच्या (नाबाद १११) खेळीमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात न्यूझूीलंडचा संघ १८.५ षटकात १२६ धावांवर आटोपला. कप्तान विल्यमसनने ४ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावा केल्या. भारताकडून दीपक हुडाने १० धावांत ४ बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी २ बळी मिळाले.
भारताचा डाव
इशान किशन आणि ऋषभ पंत यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. किशनने ५ चौकार आणि एका षटकारासह ३६ धावा केल्या. तर पंत ६ घावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यरही (१३) जास्त काही करू शकला नाही. मुंबईकर सूर्यकुमार यादवने जबरदस्त खेळी करत भारताची धावसंख्या वाढवली. त्याने ४९ चेंडूत शतक ठोकले. १९व्या षटकात त्याने आपले शतक पूर्ण केलेच सोबत लॉकी फर्ग्युसनला २२ धावा चोपल्या. शेवटच्या षटकात न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साऊदीने हॅट्ट्रिक घेतली. त्याने हार्दिक पंडया (१३) आणि दीपक हुडा (०) आणि वॉशिंग्टन सुंदर (०) यांना बाद केले. भारताने २० षटकात ६ बाद १९१ धावा केल्या. सूर्यकुमारने ५१ चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांसह १११ धावा ठोकल्या.
A well deserved Player of the Match award for @surya_14kumar as #TeamIndia win by 65 runs in the 2nd T20I 👏👏
Scorecard – https://t.co/OvmynDiyd8 #NZvIND pic.twitter.com/TuYSRsIIgQ
— BCCI (@BCCI) November 20, 2022
हेही वाचा – चित्रपटसृष्टीत हळहळ..! हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; वय अवघे २४ वर्ष!
दोन्ही संघांची Playing 11
न्यूझीलंड : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कप्तान), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन आणि अॅडम मिल्ने.
भारत : इशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पंड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद सिराज.