NZ vs IND 1st ODI : भारताकडून ‘या’ दोघांचा डेब्यू..! ‘अशी’ आहे दोन्ही टीमची Playing 11

WhatsApp Group

NZ vs IND 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळवला जात आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ युवा खेळाडूंसोबत एकदिवसीय मालिका खेळत आहे. वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग भारताकडून वनडे पदार्पण करत आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी भारताने सध्याच्या न्यूझीलंड दौऱ्यावर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची टी-२० मालिका १-० ने जिंकली होती. मालिकेतील पहिला टी-२० सामना पावसाने व्यत्यय आणला, तर दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दणदणीत विजय नोंदवला. पावसामुळे तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना बरोबरीत सुटला.

हेही वाचा – Unhealthy Foods For Kids : सावधान..! चुकूनही मुलांना खायला देऊ नका ‘या’ गोष्टी

दुसरीकडे किवी संघही अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि स्फोटक सलामीवीर मार्टिन गप्टिलशिवाय मैदानात उतरत आहे. २०१७ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळलेल्या अॅडम मिल्नेला न्यूझीलंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. भारत विश्वचषक स्पर्धेचे यजमान असल्याने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळण्यासाठी आधीच पात्र ठरला आहे. सध्या न्यूझीलंडचा संघ विश्वचषक सुपर लीगच्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे.

दोन्ही संघांची Playing 11

भारत – शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

न्यूझीलंड – फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन.

Leave a comment